PMC Education Department | MLA Madhuri Misal |पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार आक्रमक

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

PMC Education Department | MLA Madhuri Misal |पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार आक्रमक

 

PMC Education Department | MLA Madhuri Misal |वर्गात शिक्षक शिकवायला येत नाहीत, मुला – मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्य आणि सुरक्षिततेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत अशी टीका करीत, पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या (PMC Primary Education Department) गलथान कारभाराविरोधात आमदार माधुरी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) आक्रमक पवित्रा घेतला. (PMC Education Department | MLA Madhuri Misal)

शिक्षकांची रिक्त पदे, खाजगी संस्थांशी कराराद्वारे चालविले जाणारे वर्ग, खाजगी संस्थांना चालवायला दिलेली क्रीडांगणे, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची असुविधा, रखवालदार आणि सुरक्षा रक्षक जागेवर नसणे, विद्युत व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसणे, परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधी आदी समस्यांवर लक्षवेधी सूचनेद्वारे मिसाळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून शिक्षण मंत्र्यांनी या शाळांना अचानक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी. ज्या शाळा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. (Pune Municipal Corporation)

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘ शिक्षण विभागाच्या गैरकारभारामुळे निर्माण झालेल्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नसून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आठवी ते दहावीचे माध्यमिक विभागाचे वर्ग खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविले जातात. या संस्थांचे शालाव्यवस्थापन समाधानकारक नाही. माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या नियुक्त्या खासगी संस्था कंत्राटी पद्धतीने करतात. या नियुक्त्या करताना शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे यासंस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यात अपयशी ठरतात. या माध्यमिक शाळांची जबाबदारी राज्य सरकार किंवा महापालिकांनी घ्यावी. ‘ (PMC Pune Schools)

सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीला उत्तर दिले. सामंत म्हणाले, ‘ पुणे महापालिका शिक्षण विभागाकडे एकूण २७२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या १८५, इंग्रजी माध्यमाच्या ५२, उर्दू माध्यमाच्या ३३ आणि कन्नड माध्यमाच्या २ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २४२५ शिक्षकांच्या पदांना मान्यता असून, त्यापैकी ३५२ पदे रिक्त आहेत. समाविष्ट ३४ गावांमधील जिल्हा परिषदेच्या ६६ प्राथमिक शाळा महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘ (Maharashtra Monsoon Session)

सामंत म्हणाले, ‘ माध्यमिक विभागाच्या २६ शाळा चालविल्या जातात, या शाळांसाठी २०५ शिक्षक पदे मंजूर आहेत. परंतु केवळ ७५ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या १३० इतकी आहे. २०१ ९ पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती झालेली नाही. उच्च न्यायालयाची मनाई असल्याने ही भरती झाली नाही. आता न्यायालयाने भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून, पुढील काही दिवसांत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात शिक्षकांच्या ३० हजार जागा भरण्यात येणार आहेत. ‘ सामंत पुढे म्हणाले, ‘ मिसाळ यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. पर्वती विधानसभा मतदारसंघातील सरसेनापती हैबतराव शिळीमकर शाळा, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, सिताराम आबाजी बिबवे इंग्रजी माध्यमिक शाळांची गैरसोयींची माहिती घेतली जाणार आहे. शाळांना अचानक भेटी देऊन ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मिसाळ यांची सूचना मान्य करीत आहोत. माध्यमिक शाळांनी राज्य सरकारची मान्यता घ्यावी यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार आहेत. (Pune News)


News Title |PMC Education Department | MLA Madhuri Misal |MLA Aggressive Against Mismanagement of Pune Municipal Primary Education Department

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Meri Mati Mera Desh |  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत “मेरी माटी मेरा देश” (Meri Mati Mera Desh)  उपक्रम राबविणेकामी तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसर (Nodal Officer) यांची क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office’s) आणि परिमंडळ स्तरावर नेमणूक करण्याचे आदेश उपायुक्त्त चेतना केरुरे (Deputy Commissioner Chetana Kerure) यांनी दिले आहेत. (Meri Mati Mera Desh)

आदेशानुसार  “आजादी का अमृत महोत्सव” (Aazadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “मेरी माटी मेरा देश” उपक्रम १६-२० ऑगस्ट पुणे महानगरपालिका क्षेत्रातील घरांसाठी व संस्थासाठी तिरंगा ध्वज वाटपाचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी  ३०-३५ हजार झेंडे तपासणे, नागरिक, सोसायटी, संस्था यांना वाटप करणे कामी आपले स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे व त्याकरिता सर्व परिमंडळ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालये यांनी त्यांचे अखत्यारीतील नोडल ऑफिसर यांची त्वरित नेमणूक करायची आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Meri Mati Mera Desh | Order to field offices to appoint nodal officer for distribution of tricolor flag

Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

| जिल्हा प्रशासनाकडून तक्रार

Pune Municipal Corporation | पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) करण्यात आली आहे. असे 73 कर्मचारी आहेत. त्यामुळे आगामी काळात कामात टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाले तर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिला आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील सेवकांच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी संबंधित विधानसभा मतदार संघ यांचेकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही सेवक निवडणूकविषयक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे  पत्रान्वये  महापालिका आयुक्त यांना कळविण्यात आले आहे.
त्यानुसार बरेच कर्मचारी  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामकाज करत नसल्याचे दिसून आले आहे. सदर सेवकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कामकाज हे आपल्या पदाचे कामकाजास सांभाळून करावयाचे आहे. 73 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी कामकाजामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळा केल्याचे सिद्ध झाल्यास “लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील परि. २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम,
१९५१ मधील परि. १३४” अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहती. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच ही जबाबदारी खाते प्रमुखांनी घ्यावी, असे ही अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे. (PMC Pune News)

—-
News Title |Refusal of 73 municipal employees to work as BLOs| Complaint from District Administration

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 1283 कोटींचे उत्पन्न | बुधवारी मिळाले 15.26 कोटी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 1283 कोटींचे उत्पन्न

| बुधवारी मिळाले 15.26 कोटी

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स (Pune Property Tax) मधून पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) 1283 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. दरम्यान सवलतीत मिळकतकर भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. (PMC Property tax Department)

 पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील मिळकतधारकांना (Property Holder) ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १०% सवलत देण्यात आली होती. परंतु  ३१ जुलै रोजी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये (Property tax Discount) भरण्याची मुदत  ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली होता. तसेच पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune) जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी योजनेचा कालावधी देखील दि. ०२ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता. (PMC Property Tax Department)
दरम्यान आज 12 वाजता ही मुदत संपणार आहे. आजच्या दिवशी रात्री 8 पर्यंत महापालिकेने 15.26 कोटी वसुली केली आहे. तर एप्रिल पासून ते आतापर्यंत महापालिका तिजोरीत 1283 कोटी रुपये जमा झाले आहेत. अशी माहिती उपायुक्त देशमुख यांनी दिली. 
—-
 
News Title |PMC Property Tax Department | 1283 crores income to Pune Municipal Corporation from property tax | 15.26 crore received on Wednesday

PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

PMC Security Guard | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत (PMC Security Department) पुरविण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांचे वेतन (Salary) विहित वेळेत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.  बहुउद्देशीय कामगारांची हजेरी संबंधित खात्यांकडून विहित वेळेत प्राप्त होत नसल्याने कामगारांना महिनेमहा १० तारखेच्या आंत वेतन आदा करणे अडचणी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी नियमावली ठरवून दिली आहे. (PMC Security Guard)

अशी आहे नियमावली

१. सर्व संबंधित खात्यांकडून महिनेमहाची हजेरी २५ तारीख गृहित धरून संभाव्य हजेरी संबंधित खात्याचे पर्यवेक्षकीय अधिकारी/ विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावी. सदर हजेरी महिनेमहा महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ठेकेदारास देण्याची तजवीज करावी.
२. ठेकेदाराने त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचे वेतन पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आदा करण्याची
दक्षता घ्यावी.
३. संभाव्य हजेरीमध्ये कामगार गैरहजर राहिल्यास सदर गैरहजेरीचे वेतन त्याचे पुढील वेतनातून वसूल करण्याची कारवाई करण्यात करावी.
संबंधित खात्यांकडून विहित वेळेत हजेरी न मिळाल्यामुळे बहुउद्देशीय कामगारांचे वेतन करण्यामध्ये विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची राहील. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
——
News Title | PMC Security Guard | Municipal Additional Commissioner has decided the rules regarding the salary of security guards

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Vaccination Drive | पुणे महापालिका आगामी तीन महिने राबवणार लसीकरण मोहीम | लहान मुले आणि गरोदर मातांना लाभ

 PMC Vaccination Drive |  केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) ऑगस्टपासून आगामी ३ महिन्यात ” मिशन इंद्रधनुष्य ५.०” लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबविण्यात येणार आहे. ह्या मोहिमेत मुख्यत्वेकरून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना त्याचप्रमाणे ज्या बालकांचे लसीकरण वयोमानानुसार आवश्यक आहे, अशा सगळ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Vaccination Drive)

 मोहिमेच्या ३ फेऱ्या पुढील प्रमाणे –
पहिली फेरी – दि. ७ ते १२ ऑगस्ट २०२३
दुसरी फेरी – दि. ११ ते १६ सप्टेंबर २०२३
तिसरी फेरी – दि. ९ ते १४ ऑक्टोबर २०२3
“गोवर-रुबेला निर्मुलन २०२३” या केंद्र शासनाच्या मुख्य श्रोग्णाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. या मोहिमेत पहिल्यांदाच 2 ते 5 वर्षे हा वयोगट समाविष्ट करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट २०१८ अथवा त्यांनंतर जन्मलेल्या सर्व बालकांचे लसीकरण या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. या मोहिमेचे पूर्ण नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे. जोखीमग्रस्त भाग जसे की ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. गोवर रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले भाग, लसीकरणाम नकार देणारा समाज झोपडपट्टी बांधकाम ठिकाणे, विटभट्ट्या अशाप्रकारच्या जोखीमग्रस्त भागात विशेष लसीकरण सत्रे आरोग्य विभागाकडून आयोजित करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation News)
या मोहिमेची तयारी करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ३१/०७/२०२३ रोजी सिटी टास्क फोर्सची मिटिंग घेण्यात आली असून या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, सामाजिक विकास विभाग, रेल्वे व एस. टी. परिवहन मंडळ यांना सहभागी करण्याचे आदेश देण्यात आले. मोहिमेची जनजागृती करण्यासाठी शाळांमार्फत प्रभातफेरी तमेच जोखीमग्रस्त भागात पथनाट्ये करण्याचे नियोजन करण्यात आले. (PMC Pune News)

या मोहिमेत नव्याने बालकांचे लसीकरण करण्याकरिता U WIN हे ऑनलाईन पोर्टल बनविण्यात आले असून या पोर्टलद्वारे लसीकरण मंत्रांचे दिनांक वेळ ठिकाणे याची सर्व माहिती तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे. अशी माहिती अतिमहापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांचेकडून देण्यात आली आहे. तसेच लमीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या जवळच्या दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार (Health Chief Dr Bhagwan Pawar) यांच्याकडून करण्यात आले आहे

” मिशन इंद्रधनुष्य ५.०” या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महापालिकेकडून खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, धर्मगुरू, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या घरातील अथवा आपल्या शेजारील सर्व बालकांचे व गरोदर मातांचे पूर्ण लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केले आहे.
——
News Title | PMC Vaccination Drive | Pune Municipal Corporation will conduct vaccination campaign for the next three months Benefits for infants and pregnant mothers

PMC Waste to Wealth Book | पुणे महापालिकेच्या Waste to Wealth पुस्तकाचे अनावरण

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Waste to Wealth Book | पुणे महापालिकेच्या Waste to Wealth पुस्तकाचे अनावरण

PMC Waste to Wealth Book | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने “WASTE TO WEALTH” ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे अनावरण सचिव MoHUA भारत सरकार यांचे शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.  (PMC Waste to Wealth Book)

पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा वर्गीकृत करण्याची व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. याकरीता हॉटेल्स व व्यावसायिक, रो- हाऊस, बंगले, अपार्टमेंट व इतर मिळकतींमधून निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका असे विभाजन करून ओला कचरा जेथे निर्माण होतो तेथेच शास्त्रोक्त पध्दतीने (गांडूळखत, कंपोस्टिंग, बायोगास, ओ. डब्ल्यु.सी.इ. पध्दतीने ) जिरविल्यास कचरा व्यवस्थापनास मदत होणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत “WASTE TO WEALTH” ही ओला कचरा जिरविण्याचे तंत्रज्ञान पुस्तिका तयार केली आहे. “WASTE TO WEALTH” या पुस्तिकेमध्ये सेंद्रिय कच-याचे खतात अथवा बायोगामामध्ये रुपांतर करण्याची संपूर्ण माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडली आहे. त्याचप्रमाणे या विषयातील तज्ञ व मार्गदर्शक यांचे संपर्क क्रमांक त्यांच्या विविध प्रक्रिया पध्दती यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे अनावरण आज  मनोज जोशी, सचिव MoHUA भारत सरकार यांचे शुभहस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation)

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे श्री. प्रदीप जांभळे पाटील मा. अतिरिक्त आयुक्त, श्री. संजय कोलते स्मार्ट सिटी चे CEO, श्री रविंद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), डॉ.कुणाल खेमनार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई), श्रीमती पूनम मेहता, मा.सह आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, श्रीमती उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. श्रीनिवास बोनाला मुख्य अभियंता (प्रकल्प), श्री. विजय कुलकर्णी मुख्य अभियंता (पथ), श्री. अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता (पाणी
पुरवठा विभाग), श्री. सचिन इथापे, उपआयुक्त (सामान्य प्रशासन), श्री. माधव जगताप, उप आयुक्त (पर्यावरण विभाग), डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन
इ. अधिकारी उपस्थित होते. (PMC Pune News)
——
News Title | PMC Waste to Wealth Book | Unveiling of Pune Municipal Corporation’s Waste to Wealth book

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

| मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री

PM Modi in Pune News | शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो (Pune Metro) सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले. (PM Modi in Pune News)
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या (Pune Metro Phase 2) पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह  पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (Waste to Energy) संयंत्राचे उद्घाटन, पुणे (Pune Municipal Corporation l) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे (Pimpari Chinchwad Municipal Corporation) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (DCM Ajit Pawar), पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil), सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

*पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर*

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.

*‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर*

श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

*महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली*

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे.  रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या  अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.

*डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा*

महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.

*गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती*

गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

*देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल | मुख्यमंत्री*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत.
प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

*पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल | देवेंद्र फडणवीस*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.
चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुर्नप्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.

*शहराच्या विकासात पुणेकरांची साथ | उपमुख्यमंत्री अजित पवार*

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.
ते पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज पंतप्रधान यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा,आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

*विकासकामांमुळे शहर विकासाला गती*

पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे.
0000
News Title | PM Modi in Pune News | Inauguration and Bhoomi Pujan of various projects including Pune Metro lines by Prime Minister Narendra Modi

PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली

PMC Property Tax Department | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील मिळकतधारकांना (Property Holder) ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १०% सवलत देण्यात आली होती. परंतु  ३१ जुलै रोजी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये (Property tax Discount) भरण्याची मुदत  ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune) जाहीर करण्यात
आलेल्या लॉटरी योजनेचा कालावधी देखील दि. ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) यासाठी मान्यता दिली आहे. अशी माहिती उपायुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax Department)

—-

News Title | PMC Property Tax Department | Property tax department relief for Pune residents Exemption tax payment deadline extended

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

PMC Pune News | पावसाळा (Monsoon) संपेपर्यंत आवश्यक तेथेच खोदाई (Trenching) करण्यात यावी. अनावश्यक खोदाई टाळावी असे निर्देश  अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिले आहेत. तसेच खोदाई करताना ठेकेदार बोर्ड लावत नाहीत. अशा ठेकेदारावर (Contractor) कारवाई करण्याचेही आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

शहरातील खोदाई बाबत अतिरिक्त आयुक्तांनी पथ, विद्युत आणि मलनिःस्सारण विभागासोबत बैठक घेतली. यावेळी हे आदेश देण्यात आले. शहरातील वाहनांची संख्या सुमारे ५० ते ५५ लाख व बाहेरून दररोज कामासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे १० लाख अशी सुमारे ६० ते ६५ लाख वाहनांची वर्दळ शहरात असते. शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तीनुसार ठेकेदाराचे कामाचे ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे बोर्ड कामाचे ठिकाणी लावले जात नाहीत. बोर्ड लावणेची कार्यवाही करण्यात यावी. बोर्डवर कामाचे नाव,काम सुरू दिनांक, पूर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव दुरध्वनी क्रमांक इ. सर्व माहिती नमूद असावी. तसेच खोदाईचे ठिकाणी आवश्यक ते बॅरिकेटिंग करण्यात येवून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यामुळे नागरिकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले. (PMC Road Department) 

पथ, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत यांनी खोदाईबाबत समन्वय करून पुढील एक महिन्यात करावयाच्या खोदाईबाबत कार्यक्रम ( Programme ) तयार करावा. त्याव्यतिरिक्त खोदाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोणता विभाग कोठे खोदाई करणार आहे याबाबत समन्वय करण्यात यावा. विदयुत विभागाचे ATMS चे काम चालू आहे. रिईनस्टेटमेंटचे काम व्यवस्थित झालेले नाही. रिईनस्टेटमेंटची कामे शास्त्रोक्त पध्दतीने होत नाहीत. रिईनस्टेटमेंटच्या कामाची कनिष्ठ अभियंता यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. सिंहगड रोडबाबत वर्तमानपत्रात बऱ्याच बातम्या प्रसिध्द होत असून पथ विभागाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व खड्डे दुरूस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. असे ही अतिरिक्त आयुक्तांनी आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation) 
—/–
News Title | PMC Pune News | Action in case of unnecessary digging Warning of Additional Municipal Commissioner