PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

| विवेक वेलणकर यांचा आरोप

 

PMC Water Meter | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) सध्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Equal water supply scheme) घरोघरी मीटर बसवत आहे. मात्र अजूनही महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो. याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velnkar) यांनी केला आहे. तसेच मीटर बसवण्याची मागणी केली आहे. (PMC Pune Water Supply Department)

 

विवेक वेलणकर यांच्या निवेदनानुसार  पुणेकर पाण्याचा अति वापर करतात हा आरोप सातत्याने केला जातो. या पार्श्वभूमीवर ही पाणी मीटर ची योजना राबवली जात आहे. बसवलेल्या मीटर्स पैकी ज्या नागरीकांचा पाणीवापर दरडोई दर दिवशी १५० लिटर पेक्षा जास्त होत आहे. त्यांना कायदेशीर कारवाई च्या धमक्या देणाऱ्या  नोटीसा ही गेल्या वर्षी पाठवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती अधिकार दिनात समान पाणीपुरवठा कार्यालय प्रमुखांकडे महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी किती पाणीवापर होतो याच्या माहितीसाठी गेलो असता त्यांनी महापालिकेच्या कोणत्याही प्राॅपर्टी मधे अजून पाणी मीटर्स बसवले नसल्याचे मला सांगितले होते.  लवकरच या ठिकाणी आम्ही पाणी मीटर बसवू असे सांगितले. मात्र परवा माहिती अधिकार दिनात परत एकदा याची माहिती मिळवण्यासाठी गेलो असता अजूनही महापौर बंगला , महापालिका आयुक्त निवास , अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे मला सांगितले गेले. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप वेलणकर यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)

———–

आता तरी पाणीपुरवठा विभाग पुण्यातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाणीमीटर बसवतील आणि त्यांचा पाणीवापर किती आहे हे दरमहा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.

——–

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

| काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांची परवानगी

|  माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणार्‍या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग (Vishrantwadi-Dhanori road) अखेर मोकळा झाला आहे. या मार्गावरील बुद्ध विहाराचे इतर ठिकाणी स्थलांतर करून संबंधीत खासगी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांनी (PMC Pune Commissioner) मंजूरी दिली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी या कामासाठी सकारात्मक तोडगा काढत पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. (Pune Municipal Corporation)

विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणारा रस्ता अरुंद होता. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्याबाबत महापालिका स्तरावर विचारविनिमय सुरू होता. मात्र या मार्गावर खासगी जागेत असणार्‍या बुद्ध विहाराच्या स्थलांतराचा अडथळा निर्माण झाला होता. सामाजिक भावनांचा आदर करून तसेच महापालिका प्रशासनाच्या विकासात आडकाठी न येता माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या वर सकारात्मक तोडगा काढला. बुद्ध विहाराचे स्थलांतर करताना पर्यायी जागेची उपलब्धता करावी, असे सुचविले. त्यानुसार बुद्ध विहाराला पर्यायी जागा देण्याचे ठरले आहे. विहार बांधकामाला परवानगी मिळाली आहे. विकसकाकडून लवकरच त्याचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. (PMC Pune)

सध्या सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मंजूरी दिली आहे. लवकरच प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

डॉ. धेंडे यांचा पाठपुरावा –

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी यापुर्वीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, मिळकतधारक आगरवाल, बुद्धविहाराचे अध्यक्ष राजीव बेंगाळे आदीसह आदीसह महापालिका अधिकारी उपस्थित होते. यामध्ये काही बाबींवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये मिळकतधारक राधेशाम आगरवाल यांनी बुद्ध विहाराच्या जागेच्या मोबदल्यात सर्व्हे नंबर 46 मधील वॉटर वर्क्सकरिता आरक्षित जागेतील झोपड्या काढून 2 आर क्षेत्र बुद्धविहारासाठी द्यावे. त्याचे बांधकाम करावे. वॉटर वर्क्स आरक्षित क्षेत्राचा मोबदला आगरवाल यांना टीडीआर स्वरूपात द्यावा. 60 फूट डीपी रस्त्यामधील बुद्ध विहाराची जागा रिकामी झाल्यानंतर उर्वरीत क्षेत्राचा प्रलंबित टीडीआर देण्याची कार्यवाही करावी, आदी विषयावर एकमत झाले.

——–

रस्ता रुंदीकरण करताना सध्याच्या बुद्ध विहाराचे योग्य ठिकाणी स्थलांतर होणे अपेक्षित आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पर्यायी जागेत बुद्ध विहार स्थलांतर करून त्याचे बांधकामही विकसकाने करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बौद्ध बांधवांच्या भावनांचाही आधार केला जाणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————

PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर!

|  Toilet Seva App चे उद्या उदघाटन

PMC Toilet Seva App | पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची (Pune Public Toilet) उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता पुणे महापालिका (PMC Pune) आणि  अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले आहे. या एपचे उदघाटन उद्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. (PMC Toilet Seva App)
उपायुक्त राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार  या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results चे filtering करणे उदाहरणार्थ वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, डस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स, community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्य आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक, वारकरी तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे. २२ जून ला महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते या Toilet Seva app चे लॉचिंग करण्यात येत असून हे app नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात येत आहे. पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या app चा वापर करून आपला सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. (PMC Solid Waste Management Department)
—-
News TitlePMC Toilet Seva App | Get information about Pune Municipal Corporation toilets now on mobile app

Pune News |Pune University |पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pune News |Pune University |पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!

|पालकमंत्री मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

| सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्यरोहिणी महोत्सवाचे आयोजन

Pune News | Pune University | भारतीय संस्कृतीत (Indian Culture) नृत्यकलेला (Dance Art) अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल (Dance Academy) पुणे विद्यापीठात (Pune University) उभारणार असून, त्यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज केली. तसेच सवाई गंधर्वच्या (Sawai Gandharva) धर्तीवर नृत्य रोहिणी महोत्सव (Nritya Rohini Mahotsav) हा कार्यक्रम नृत्यकलाकारांसाठी स्वतंत्र कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Pune News Pune University)

नृत्य गुरु मनिषा साठे (Dancer Guide Manisha Sathe) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Theatre) मनेषा नृत्यालय कार्यक्रम तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते. यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर (Vidyavachaspati Shankar Abhyankar), नृत्य गुरु शमा भाटे (Dancer Shama Bhate), सुचेता चापेकर (Sucheta Chapekar), प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर (Singer Arti Anklikar Tikekar) यांच्या सह कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह शास्त्रीय नृत्यप्रेमी उपस्थित होते. (Dance Academy in pune university)

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक सुप्रसिद्ध कलाकार या शहरात वास्तव्यास आहेत. नृत्य क्षेत्रातील अनेक दिग्गज देखील आपल्या कलेची जोपासना करतात. त्यामुळे नृत्यकला संवर्धनासाठी पुण्यात समर्पित व्यासपीठ असावे; अशी मागणी होत होती. त्याला अनुसरूनच पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारण्यात येणार आहे. (Dance Art in indian culture)

ते पुढे म्हणाले की, “या नृत्य संकुलासाठी पुणे विद्यापीठाने पाच एकर जागा प्रस्तावित केली आहे. तसेच यासाठी २२५ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर उर्वरित २०० कोटी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे संकुल साकार झाल्यानंतर, देश-विदेशातील शास्त्रीय नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.” (Pune university news)

नामदार पाटील पुढे म्हणाले की, “पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचे एक वेगळेच महत्त्व आहे. देश विदेशातील अनेक शास्त्रीय गायक इथे आपली कला सादर करण्यासाठी आतूर असतात. त्याचप्रमाणे नृत्य कलाकारांना ही आपली कला सादर करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, नृत्य रोहिणी महोत्सव यंदा डिसेंबर २०२३ पासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यालाही नृत्यप्रेमींकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल,” अशी अपेक्षा व्यक्त केली. (Pune Marathi news)


News Title |Pune News | Pune University | Pune University will set up a dance complex!Announcement by Minister Chandrakantada Patil

Municipal Election | PMC Election | महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये? 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

Municipal Election | PMC Election | महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये?

| देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शक्यता 

Municipal Election | PMC Election | पुणे महापालिकेसह (Pune Municipal Corporation) राज्यातील महापालिकांच्या निवडणुका (Local body Elections) ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली. त्यामुळे आता निवडणूक होण्याबाबत स्पष्टता आल्याचे म्हटले जात आहे. (PMC Pune election)

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal Election) रखडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, अशी विचारणा अनेकदा होत असते. पण, काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण, आता या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे मोठे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. काही कायदेशीर बाबींमुळे महापालिका निवडणुकांचे प्रकरण कोर्टात आहे. पण, आता फडणवीसांच्या वक्तव्यामुळे काहीसा स्पष्टपणा आला आहे.

News Title | Municipal Election | PMC Election | Municipal elections in October-November? | Devendra Fadnavis expressed the possibility

PMC Pune Property Tax Bill | 15 मे पासून मिळकत कराची बिले दिली जाणार | 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Property Tax Bill | 15 मे पासून मिळकत कराची बिले दिली जाणार

| 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत

PMC Pune Property Tax Bill | पुणे महानगरपालिकेकडून (PMC pune) निवासी मिळकतींना (Residential Property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत कायम राहणार आहे. ०१.०४.२०१९ पूर्वीच्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींना (Non residential property) देखभाल दुरुस्ती करिता देण्यात येणारी १५% वजावट रद्द करून १०% वजावट देण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी ०१.०४.२०२३ पासून करण्यात येणार आहे . अशा मिळकतींची सन २०२३-२४ करिताची देयके (property Tax Bill) १५.०५.२०२३ पासून देण्यात येणार आहेत. नागरिकांना ऑनलाईन बिले तात्काळ मिळतील. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती  महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (Additional commissioner Dr Kunal Khemnar) यांनी दिली. (PMC pune property Tax bill)

महापालिकेकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे.  मिळकतींचे सन २०२३-२४ ह्या आर्थिक वर्षाची देयके ३१.०५.२०२३ पर्यंत बनवण्यात येणार आहेत. वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना  ०१.०४.२०१८ पासून ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत दि. ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वःवापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune Municipal Corporation property tax)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १४०-अ अन्वये विहित मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकास सर्वसाधारण करात ५% किंवा १०% सवलत देण्यात येते. त्या सवलतीचा कालावधी ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत देण्यात आला आहे. १५.०८.२०२३ पासून प्रथम सहामाहीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम परिशिष्ठ ‘ड’ कराधान नियम प्रकरण ८ मधील नियम ४१ नुसार दरमहा २% शास्ती आकारण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pmc Pune news)

Nana Patole | २०१९ च्या लोकसभा निवडणुकिसाठी पूर्वनियोजित असलेला पुलवामा हल्ला | नाना पटोले

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

२०१९ च्या लोकसभा निवडणुकिसाठी पूर्वनियोजित असलेला पुलवामा हल्ला | नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी दाखविलेली निष्काळजीपणाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ” शर्म करो मोदी शर्म करो” हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की काश्मीरचे माजी राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी पुलवामा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात जे सत्य देशातील नागरिकांसमोर मांडले यावरून सिद्ध होते की केंद्रातील मोदी सरकार हे शहीदांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ह्या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले परंतु मोदी सरकारने ३०० किलो RDX कोठून आणले. त्याच पद्धतीने जवानांना विमानाची सुरक्षितता का देण्यात आली नाही याबाबत चौकशी सुध्दा केंद्रीय सरकारने केली ‌नाही कोणत्याही प्रकारचा गुन्हाही दाखल केला नाही. यावरून सिद्ध होते की पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्याचा २०१९च्या लोकसभा निवडणुकिसाठी वापर करण्यात आला. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २०हजार कोटी कुणी गुंतवले आणि हा काळा पैसा कोणाचा आहे याचे उत्तर देखील देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी द्यायला पाहिजे कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात JPC ची मागणी कॉंग्रेससहीत देशातील सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली आहे पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात राज्यभर ” शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलने घेण्यात आली असून याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, ऍड अभय छाजेड, संजय बालगुडे,आबा बागुल,चंदूशेठ कदम,कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, मेहबूब नदाफ, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख ,अजित दरेकर, सुजाता शेट्टी, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल धाडगे, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी विजय खळदकर, सतिश पवार, अजित जाधव, रमेश सकट,रवी ननावरे, सोमेश्वर बालगुडे, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे,शिलार रतनगिरी,द स् पोळेकर, प्रशांत सुरसे, शिवराज भोकरे, प्रकाश पवार, सुधीर काळे,चेतन आगरवाल, सुरेश कांबळे,मामा परदेशी, दिपक ओव्हाळ, सुरेश चौधरी, श्रीरंग चव्हाण, वैष्णवी किराड, ज्योती परदेशी,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ, इंद्रजित भालेराव, कृष्णा सोनकांबळे,लतेंद्र भिंगारे इत्यादी उपस्थित होते

Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानकाचे (Civil court metro station) 95 टक्के काम पूर्ण झाले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा समितीकडून पुढील दोन महिन्यांत या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गिका सुरू केल्या जातील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. (pune metro)

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाज ते रामवाडी (16 किमी) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून, या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण सात एन्ट्री पॉइंट असणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानकात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर बसविण्यात येत आहेत. सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका देखील पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकात मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोवर येथून नियंत्रण केले जाईल. मेट्रो भवनची इमारत खइउ प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून, मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीएमएलचा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लॅंडस्केप अत्यंत आकर्षक करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजे, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून, हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक असणार आहे. या भूमिगत स्थानकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच असून, देखील तेथे थेट सूर्यप्रकाश पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्‍या खोल स्थानकावर सूर्यप्रकाश पोहचणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक असणार आहे.

 
दोन महिन्यांत फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाशांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. पीसीएमसी ते वनाज या 22 किमीचा प्रवास केवळ 31 मिनिटांमध्ये पार करणे शक्‍य होणार आहे.

MHADA | Pune | पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

| 5 हजार 915 सदनिकांची लॉटरी

म्हाडाने (MHADA Pune) विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील 5 हजार 915 सदनिकांची सोडत (Lottery) जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना गुरुवार दि.5 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली. (Pune MHADA Lottery)

म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका , 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 990 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका असे एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत होणार आहे. तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध आहेत, अशी माहिती माने पाटील यांनी दिली.

सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात – दि. 5 जानेवारी
ऑनलाइन पेमेंट स्वीकृती सुरुवात – दि. 7 जानेवारी
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुद्‌त – दि. 4 फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास अंतिम मुदत – दि. 5 फेब्रुवारी
ऑनलाईन पेमेंट,अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि. 6 फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची यादी प्रसिद्ध – दि. 15 फेब्रुवारी
सोडत – दि.17 फेब्रुवारी

Ajit Pawar Vs BJP | अजित पवार यांच्या विरोधात पुणे भाजपचे आंदोलन | पवार यांनी माफी मागण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

चुकीच्या वक्तव्यासाठी अजित पवार यांनी माफी मागावी

| भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल (Chhaptrapati Sambhaji Maharaj) चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City president Jagdish Mulik) यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.