PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन” आमची सहयोगी संघटना नाही | कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे महापालिका आयुक्तांना पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” आमची सहयोगी संघटना नाही | कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे महापालिका आयुक्तांना पत्र

PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union  | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar Union) (मान्यताप्राप्त) संघटनेची “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” (कारकून विभाग), (PMC Employees Union) या सहयोगी संघटना नाही. असे पत्र कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कडून महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) देण्यात आले आहे. पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत आम्ही त्यांना सहयोगी मानणार नाही, असे पत्राद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही गेल्या 81 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत
कार्यरत असून पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव MRTU ACT अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे. एवढ्या प्रदीर्घ कार्यकाळात सर्व सेवकांचे प्रश्न सोडवताना औद्योगिक शांततेचा भंग होणार नाही याची जाणीव ठेवून पुणे महानगरपालिका कामगार युनियन ने कामकाज चालवले आहे. हे कामकाज करत असताना अधिकारी, अभियंता, डॉक्टर असोसिएशन हे विभाग पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सहयोगी राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे कारकून विभागातील काही विशिष्ट प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन याची स्थापना पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली व एक सहयोगी संघटना म्हणून ते आज पर्यंत कार्यरत होते. (PMC Pune)
पत्रात पुढे म्हटले आहे कि, परंतु अलीकडील काळात पी.एम.सी एम्प्लॉईज युनियन मध्ये पदाधिकारी बदल झाला आहे व हा बदल झाल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही सुचित करतो की पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत व त्याबाबत आम्ही  लेखी पत्र देऊन अवगत करेपर्यंत आम्ही पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन बरोबरचे आपले सहयोगी संघटना म्हणून संबंध स्थगित केले आहेत. असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
————-
News Title | PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “PMC Employees Union” is not our Affiliate Union Letter from Labor Union (Recognised) to Municipal Commissioner

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee |विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल व ग्रेड ग्रेड सेपरेटर निर्मितीसाठी पुणे महापालिकेच्या इस्तीमेट समितीने आज 62 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याचे बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बस संख्या ठिkठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे ठरविले होते. त्यानुसार येरवडा येथील गोलफ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. विश्रांतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलासाठी एस्टिमेट कमिटीने आज 62 कोटी रुपयांना मान्यता दिली. (Pune Municipal Corporation)


आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. ही कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यासाठी मी सातत्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महापालिकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले असून महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाच्या ६२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लवकरच या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी रस्ता, धानोरी रस्ता आणि विमानतळ रस्ता यासर्वाकंडे जाणाऱ्यांचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

———-

या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेतला. या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.

माजी आमदार जगदीश मुळीक


आंबेडकर चौक येथे मुख्यसभेत भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा दर्शनी भागांत पुर्णाकृती पुतळा बसवायचा ठराव पारित झालेला आहे. ते ही या ईस्टिमेट मधे असावे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे मनपा

———–

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पाहणी

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पाहणी

| प्रलंबित समस्या व आवश्यक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | पुणे-  पुणे महापालिकेच्या येरवडा येथील  राजीव गांधी रुग्णालयातील  (PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada) प्रलंबित समस्या व अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने महापालिका आयुक्त व आरोग्य प्रमुख यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार  अतिरिक्त महापालिका आयुक्त  विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी राजीव गांधी रुग्णालयाची नुकतीच पाहणी केली. तसेच या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. (Pune Municipal Corporation)
 यावेळी महापालिकेच्या  आरोग्य विभागातील वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद पाटील, परिमंडळ एकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा गलांडे, महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ.माया लोहार, राजीव गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बागडे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (PMC Pune)
 राजीव गांधी रुग्णालयात दररोज सुमारे साडेचारशे ते पाचशे रुग्णांची दररोज तपासणी व उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये तीन स्त्री रोग तज्ञ तसेच प्रत्येकी  दोन अस्थिरोग, भूलतज्ञ, फिजिशियन  यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यासोबतच ऑक्सिजन प्लांट अद्याप कार्यरत न झाल्यामुळे ऑक्सिजनची गरज ही महापालिकेच्या इतर रुग्णालयांतून पुरवठा करून भागवली जाते. त्यामुळे ऑक्सीजन प्लांट देखील तातडीने कार्यान्वित करण्यात यावा. मुख्य प्रवेशद्वारासह मेन गेटच्या शटरची दुरुस्ती, जुन्या लिफ्ट ऐवजी दोन नव्या लिफ्टची देखील आवश्यकता आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा जुनी झाली असून त्याची दुरुस्ती अथवा नवीन आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.  एअर कंडिशन पंखे दुरुस्ती तसेच पाण्याची वारंवार होणारी गळती या महत्त्वपूर्ण समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही. त्यामुळे फायर ऑडिट देखील करून घेणे आवश्यक आहे. या सर्व महत्त्वपूर्ण प्रलंबित समस्यांसह इतर आवश्यक उपयोजनांची मागणी यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रुग्णालयातील सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल माहिती घेतली. क्षत्रिय कार्यालय तसेच मुख्य खात्याशी संबंधित सर्वधिकार्‍यांना  तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. (PMC Health Department)
——-

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार

Categories
Breaking News PMC social पुणे

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune |स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  ०२ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी, जनजागृतीवर रॅलीचे आयोजन व उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Mahatma Gandhi Jayanti) त्यांना आदरांजली वाहण्याकरीता   नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या सहभागातून जनजागृतीपर प्रभात फेरी, रॅली व सफाईसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या गणपती चौक, पंचशील चौक, सौरभ हॉल, अलंकार टॉकीज ते महात्मा गांधी पुतळा पुणे स्टेशन या दरम्यान प्रभातफेरी, जनजागृतीवर रॅली काढण्यात आली. तसेच
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याला आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमात  आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), उपायुक्त संदीप कदम, उपआयुक्त किशोरी शिंदे (PMC Deputy Commissioner Kishori Shinde), सहा. आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे (Dr Ketaki Ghatge), मा. महापालिका सहाय्यक आयुक्त अशोक सीताराम झुळूक, सिफार संस्थेचे आनंद भाकडे, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यलयाचे ब्रँड अम्बॅसेडर राजेश गायकवाड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC Pune)

वाडीया कॉलेज मधील विद्यार्थीनी स्वच्छता ही सेवा या विषयावर सुंदर
पथनाट्य सादर केले. या ठिकाणी उत्कृष्ट कामकरणा-या सफाई सेवकांनी आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी सांभाळून काम करताना प्रसंगाअवधान राखून अनेक नागरिकांचे व आपल्या सहकारी
सेवकांचे जीव वाचविले तसेच काही सेवकांना सापडलेले मौल्यवान ऐवज परत केले तेसच काम करत असताना स्वच्छतेचा संदेश दिला. अशा सेवकांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आयुक्त विक्रम कुमार,
यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकाकडील क्षेत्रिय कार्यालयनिहाय व स्वच्छसंस्थेच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)

त्याचबरोबर १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अंदाजे २६ ठिकाणी जनजागृती मोहीम, रॅलीज अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये शहरातील माजी मा.सभासद व पदाधिकारी, पुणे शहरातील विविध शाळा / महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, गणेश मंडळे,
मोहल्ला कमिटी सदस्य व कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती व क्षेत्रीय कार्यलयाचे ब्रँड अम्बॅसेडर असे एकूण अंदाजे ४४५२ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
आयुक्त विक्रम कुमार या सदर कार्यक्रमाचे मध्ये स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. उपायुक्त संदीप कदम यांनी केले. (Gandhi Jayanti 2023)


 

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी 

Categories
Breaking News PMC social पुणे

SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी

| स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत  मेगा ड्राईवचे  आयोजन

SHS 2023 | PMC Pune |राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित (Mahatma Gandhi Jayanti)  आदरांजली वाहण्याकरीता  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरिकांनी १ तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा (SHS) २०२३ अंतर्गत पुणे शहरात पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.  ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान केले. तर ६५ हून अधिक संस्था सहभागी  झाल्या होत्या. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

https://swachhatahiseva.com/. या संकेतस्थळावर ३५० event करण्यात आले शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC NSS, NYKS, RWAs, कॉर्पोरेट कंपन्या, नागरिक इत्यादिंचा यशस्वी सहभाग (६५ हून अधिक संस्था सहभाग)
– पुणे शहरात ३५० ठिकाणी ३,६२,००० नागरिकांमार्फत श्रमदान
-एकूण ९८ टन कचरा गोळा करण्यात आला. (६१ टन सुका व ३७ टन ओला कचरा)
-५५ हून अधिक मान्यवर मा. पालक मंत्री, Celebrity, पदाधिकारी, मा. आयुक्त विविध उच्च अधिकारी, स्वच्छता Brand Ambassador व विविध संस्थाचालक/ प्रतिनिधी उपस्थित होते.
-१५/०९/२०२३ रोजी पासून पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण महत्वाचे रस्ते, विविध वारसा स्थळे, शहरातील उद्याने, टेकड्या, पुणे शहरातील विविध नदी घाट इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, स्वच्छता ड्राईव्ह राबविण्यात आला.
• महानगरपालिकेच्या चतुर्थ क्षेणी कामगारांचे आरोग्य तपासणी, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, तसेच कर्मचारीयांना सरकारी योजनाची माहिती पर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
•  ३०.०९.२०२३ रोजी पुणे महानगरपालिका सायकल क्लबमार्फत जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३५० हून जास्त सायकलस्वार सहभागी झाली होते.
●  १.१०.२०२३ रोजी भिडे पूल याठिकाणी आयोजित मुख्य कार्यक्रम व इतर सर्व स्वच्छता क्षमदान कार्यक्रम पूर्णपणे Zero Waste Event म्हणून राबविण्यात आले. या मध्ये कापडी बॅबर, Recyclable बॅनर द्वारे प्रचार प्रसार करण्यात आला. त्याच प्रमाणे Single Use Plastic व Plastic PET Bottle चा वापर पूर्णपणे टाळण्यात आला.

• सदर कार्यक्रमात मा. पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मा. लोकप्रतिनिधी, मा. आयुक्त कुमार मा. जिल्हा अधिकारी राजेश देशमुख, स्मार्ट सिटी CEO डॉ. संजय कोलते, मा. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार मा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मा. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, मा. सह आयुक्त उल्का कळसकर, मा. कृष्णन CEO APCC, मा. उपायुक्त संदीप कदम, अविनाश सकपाळ, माधव जगताप, सचिन
इथापे व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शाळा/ महाविद्यालये, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती, क्षेत्रिय कार्यालयांकडील ब्रॅन्ड अॅम्बेसिडर इ. सहभागी झाले होते.
• सदर कार्यक्रमामध्ये विविध कॉलेज च्या विदयार्थी व विविध संथा सदस्यांनी स्वच्छता बाबत पथ नाट्य, रॅप सॉग, व प्रोबोदन पर माहिती देण्यात आली. मा. पालक मंत्री या सदर कार्यक्रमाचे कौतुक केले व सदर कार्यक्रम वारंवार घेण्यत यावे असे सुचविले व स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक मा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी व आभार प्रदर्शन मा. उपायुक्त संदीप कदम यांनी केले.

PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

PMC Garbage Collection | पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation limits Included Villages) हद्दीतील नऱ्हे, आंबेगाव, धायरी या परिसरात धुळ, घाण, कचरा, राडारोडा,
पाण्याचे टँकर, खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.  या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार या परिसरात कचऱ्यासाठी कंटेनर नाहीत. कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा जागोजागी पडलेला आढळतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. डासांची पैदास होते. यामुळे डेंग्यू, हिवताप या सारख्या साठीच्या आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्यास यामुळे धोका संभवत आहे. तसेच या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथची व्यवस्था केलेली नाही. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सकाळ पासून दुपार पर्यंत कचऱ्याच्या गाड्या व पाण्याचे टँकर रस्त्यावरून फिरत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तरी सकाळी ७ च्या आत महानगर पालिकेमार्फत कचरा व्यवस्थापन व सफाई आदी कामे होऊन गेल्यास नागरिकांना सोयीचे होईल तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन रोजच्या रोज करण्यात यावे अशा मागण्या
नागरिकांनी केल्या आहेत.  नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार होऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी खासदार सुळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. (PMC Solid Waste Management Department)
——-
News Title | PMC Garbage Collection | There are no garbage containers in Dhairi, Ambegaon, Narhe areas Complaint of MP Supriya Sule to Municipal Commissioner

Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Pune Rain | पुणे – पुण्यात काल उत्साहामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion Rally) सुरू असताना सायंकाळच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला. दरम्यान यावर महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी (PMC Commissioner and Additional Commissioner) याचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

आयुक्त विक्रमकुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घ्यावी लागली.आज दुपारी चार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सुस, बावधन या भागात प्रचंड मोठा पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौक, वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत चेंबर मधील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला.अशी स्थिती सुस बावधन मध्ये देखील निर्माण झाली होती. (Pune Rain News)
——

Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 

 

| सर्व निरीक्षकांना देण्यात आले प्रशिक्षण 

 
 
Pune PMC Property Tax |  पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून (PMC Property tax Department) कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून व्यावसायिक मिळकती (Commercial Properties) सील केल्या जात आहेत. त्यापैकी 200 मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे. याबाबतचे प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार झाले आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (Pune PMC Property Tax)

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Property tax).

देशमुख यांनी सांगितले कि, दरम्यान मिळकतकर विभाग आता या सील केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. याआधी महापालिकेने कात्रज भागात लिलाव केला होता. त्यामधून महापालिकेला 4 कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले होते. त्यानुसार महापालिका सील केलेल्या मिळकतीपैकी 200 मिळकती लिलावासाठी काढणार आहे. त्याचे नियोजन तयार झाले आहे. याबाबतचे प्रशिक्षण देखील सर्व निरीक्षकांना देण्यात आले आहे. अशी माहिती देशमुख यांनी दिली.
 

– अशी असेल लिलावाची प्रक्रिया 

 
– अधिपत्र (Warrant) बजावणे 
– 7 दिवसात रक्कम जमा नाही केली तर जप्तीची नोटीस देणे. यासाठी 21 दिवसाची मुदत देणे. 
– त्यानंतर रक्कम नाही भरली तर लिलाव प्रक्रियेसाठी बांधकाम आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून मिळकतीचे मुल्याकंन करणे. 
– ही प्रक्रिया झाल्यानंतर मिळकतीचा लिलाव करणे आणि याबाबत वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यासाठी महापालिका आयुक्तांची मान्यता घेणे. 
– लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मिळकतीच्या मूल्यांकन रकमेच्या 10% बयाणा रक्कम महापालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने जमा करावी लागणार आहे.
———
News Title | Pune PMC Property Tax | Pune Municipal Property Tax Department planning to auction 200 sealed commercial properties

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती | विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती

 

| विसर्जन घाटमूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

 

PMC Care | पुणे |  पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) नव्या स्वरूपातील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म PMC CARE नागरिकाभिमुख सेवा प्रदान करतो. त्यात सिटी अपडेट्सऑनलाईन मनपा सेवाआसपासच्या डील्स आणि अजून बरेच काही उपलब्ध आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका (PMC Pune) सज्ज झाली आहे. महापालिकेच्या PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जनाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेशोत्सवाविषयी ब्लॉग्सलेख नागरिक वाचू शकतात. तसेच गणेश विसर्जनाविषयी माहिती देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲप आणि पोर्टलच्या माझ्या जवळ‘ या टॅबवर क्लिक केले कीनागरिक आपल्या जवळपासचे विसर्जन घाटमूर्ती संकलन व दान केंद्रगणेश मंडळेपार्किंगची जागाबंद रस्तेपर्यायी मार्गांविषयी माहिती मिळवू शकतात. या यादीतील एखाद्या ठिकाणाला क्लिक केले कीआपल्याला त्या ठिकाणी कसे पोहोचायचे यासाठी मॅप देखील दिसतो. अशा प्रकारे पुणेकर नागरिक ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील. त्यासाठी मात्र हे PMC CARE ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे. नागरिक त्यासाठी पुढील लिंकचा वापर करून ॲप डाउनलोड करू शकतात.

 

गूगल प्ले स्टोअरसाठी लिंक –  https://fxurl.co/rFshd 

iOS ॲपल ॲपसाठी लिंक – https://fxurl.co/4IJJ123

PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion |  कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश

| कर्मचाऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्धपदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) लटकला होता. कारण याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले होते. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र कर्मचारी संघटनाच्या मागणीनुसार सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. याला महापालिका आयुक्तांची मंजूरी मिळाली नव्हती. नुकतीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत चर्चा करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. असे असले तरी याबाबतचे कार्यालयीन सर्क्युलर येण्यासाठी अवधी लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त आयुक्तांची मान्यता घेत प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांनी चर्चा करा, असा शेरा मारला आहे. आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दाखवली असली तरी अंतिम मंजूरी दिली नाही. त्यामुळे सर्क्युलर निघण्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे. (PMC Pune News)
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Commissioner’s relief to municipal employees regarding time-bound promotions! | But the general administration department is ordered to discuss