PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

| वर्ग 3 आणि 4 मधून कर्मचारी होणार JE

PMC Junior Engineer Promotion | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून (Class 3 and 4) अभियांत्रिकी संवर्गात (Engineering Cadre) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) या पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. महापालिका प्रशासनाने त्याची तयारी केली असून 28 जानेवारी 2024 ही परीक्षा (Exam) होणार आहे. यासाठी पूर्वीच मागवलेल्या अर्जांमधून पात्र ठरलेल्या 60 कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार आहे. यात पात्र होण्यासाठी 45% गुण मिळवावे लागणार आहेत. दरम्यान या परीक्षेची पूर्वीच धास्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आता खूप अभ्यास करावा लागणार आहे. (PMC Pune)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)
सरकारकडून प्रस्ताव मान्य होऊन आल्याबरोबर प्रशासनाने तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मात्र यात नवीन कुठले अर्ज न मागवता या आधीच पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. वर्ग 3 आणि 4 मधील हे 60 कर्मचारी आहेत. जेंव्हा २५% पदोन्नतीचा नियम होता तेव्हा अर्ज मागवले होते. मात्र आता फक्त १५ टक्केच जागा आहेत. त्यानुसार अर्ज का मागवले नाहीत याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि हा निर्णय प्रशासन घेऊ शकते. त्यात आधीच पदोन्नती देण्यात उशीर झाला आहे. नवीन अर्ज मागवले तर अजून प्रक्रिया लांबेल. त्यामुळे पहिल्याच कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान या पदोन्नती बाबत महापालिका प्रशासनाकडून 2021 पासूनच तयारी सुरु केली होती. मात्र काही उमेदवारांनीच यात खोडा घातल्याने ही पदोन्नती लांबत गेली. परराज्यातून पदवी आणणाऱ्या लोकांबाबत देखील आक्षेप घेतले गेले होते. त्यातच महापालिका प्रशासनाने पदोन्नती देताना सेवाज्येष्ठतेचा विचार न करता परीक्षा घेण्याची भूमिका घेतली आणि प्रस्ताव सरकारकडे पाठवला. सरकारने दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार नवीन नियमाचा आधार घेऊन आता ही परीक्षा घेतली जाणार आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव आणि स्थापत्य ची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्यानुसार 28 जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. 100 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे. यात उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण मिळणे आवश्यक आहे. ही परीक्षा IBPS संस्था घेणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 7 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. १५% पदोन्नती नुसार आता ४० च्या आसपास जागा रिक्त आहेत. तेवढ्याच लोकांना संधी मिळणार आहे. उर्वरित लोकांना पदोन्नंती मिळवण्यासाठी नंतर परीक्षा द्यावी लागणार आहे.
खरे पाहता काही उमेदवारांनाच पाहिल्यापासूनच अशी परीक्षा घेण्याला विरोध होता. त्यांची मात्र चांगलीच गोची होणार आहे. कारण आता राज्य सरकारनेच तसे आदेश दिले आहेत. आता आक्षेप देखील घेता येणार नाही. त्यामुळे चांगला अभ्यास करण्याशिवाय आता पर्याय नाही, हे स्पष्ट होत आहे.
—-

Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती  

Categories
Uncategorized

Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

Clean Toilet Challenge | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व टॉयलेटसेवा (Toilet Seva) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील उपलब्ध सार्वजनिक शौचालयाची ठिकाण सुविधांसह माहिती देणाऱ्या टॉयलेटसेवा अॅप सत्र २ (Toilet Seva App 2) ची सुरुवात उद्यापासून करण्यात येणार आहे. महापालिकेचे स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता श्री. अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results थे filtering करणेz उदाहरणार्थ – वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, इस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १९८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी
नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे. दिनांक २२/०६/२०२३ रोजी  महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते या Toilet
घे लॉचिंग करण्यात आली होती व ते नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करणेविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल करणेकरिता Clean Toilet Challenge प्रक्षेपित करण्यात आले आहे. या अंतर्गत पाच आठवड्यांचा (१९ नोव्हेंबर (२०२३ ते २५ डिसेंबर २०२३) संपूर्ण शहरभर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे मोठ्या प्रमाणावर सामूहिक स्वच्छता व देखभाल दुरुस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
सध्या सुरू असणारया Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने Toilet Seva App च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उत्कृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर
या १५ शौचालयांमधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating / मानांकन ३० गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters / मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील.
स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार,
स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेंद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल.
या स्पर्धेची व Toilet Seva App च्या दुसऱ्या पर्वाची सुरवात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित उद्या .स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

PMC Pension Cases | पेन्शन प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क ची आता खैर नाही! | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा आता बिल क्लार्क कडे मोर्चा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Cases | पेन्शन प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क ची आता खैर नाही!

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा आता बिल क्लार्क कडे मोर्चा

PMC Pension Cases | पुणे | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांची (PMC Retired Employees) पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) प्रलंबित राहत असल्याची बाब प्रशासनाने चांगलीच गंभीरपणे घेतली आहे. मागील आढावा बैठकी वेळी विभाग प्रमुखांना धारेवर धरल्यानंतर आता आता अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी आपला मोर्चा बिल क्लार्क (Bill Clerk) कडे वळवला आहे. प्रत्येक बिल क्लार्क कडे किती पेन्शनची प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी 26 डिसेंबर ची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता बिल क्लार्क ना कामचुकारपणा करता येणार नाही. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेतून दरवर्षी शेकडो कर्मचारी निवृत्त होतात. या कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन असते. यावर ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. मात्र पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहिल्याने या कर्मचाऱ्यांना महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आणि तिथला पगार लेखनिक अर्थात बिल क्लार्क देखील पेन्शन प्रकरणाची दखल घेत नव्हता. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकरण तसेच पडून राहते. खासकरून बिल क्लार्क च्या उदासीनतेमुळे प्रकरण पडून राहते. याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून आता दर महिन्याला पेन्शन प्रकरणाचा आढावा घेतला जातो. मागील वेळी अतिरिक्त आयुक्तांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरले होते. तेव्हापासून प्रकरणे मार्गी लागण्याचा वेग वाढला होता. (PMC Pune News)
दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी सोमवारी प्रलम्बित प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी 10 पेक्षा जास्त प्रकरणे पप्रलंबित असणाऱ्या खात्यांच्या विभाग प्रमुखांना बोलावण्यात आले होते. यावेळी दिसून आले कि शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग अशा विभागाची जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी बैठकीत आदेश दिले कि प्रत्येक बिल क्लार्क कडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याची माहिती सादर करावी. त्यासाठी 26 डिसेंबर चा कालावधी देण्यात आला आहे.

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

| अंतिम सेवाज्येष्ठता यादी शारीरिक तपासणी नंतर

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. दरम्यान अंतिम सेवाज्येष्ठता यादी ही शारीरिक तपासणी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (PMC Pune Employees promotion)
 सुरक्षा अधिकारी (वर्ग-२) या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार
करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची सेवाज्येष्ठता यादी पुणे
महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवक/कर्मचारी यांनी स्वतःचे नांव, जात, जातीचा गट, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC Security Department)
पात्र/अपात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप/चुका असल्यास ७ दिवसाचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरुपात, कागदपत्रांच्या पुराव्यासहीत आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. त्यानुसार सदरच्या नोंदी घेवून व सदर पदाकरिता सुधारीत सेवाप्रवेश नियमामध्ये नमूद प्रमाणे उमेदवारांची शारिरीक तपासणीच्या अधीन राहून अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता सूचीस मान्यता घेवून ती प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या सुचविण्यात आल्यास त्यांची दखल घेतली जाणार नाही व संबंधित सेवक/कर्मचारी यांचे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राबाबत तक्रार आल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सेवक/कर्मचारी यांची नेमणूक कोणत्याही टप्प्यावर संपुष्टात आणणेबाबत आलाहीदा निर्णय घेण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.

  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध

Categories
Breaking News PMC Political social पुणे

  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध

| स्थायी समितीतील प्रस्ताव मागे घेण्याची माजी सभागृह नेते निलेश निकम यांची मागणी

PMC Commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट याचा वापर करण्याच्या व मासिक भाडे आकारणाऱ्या मिळकतींना बिगर घरगुती दराने कर आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. यास माजी सभागृह नेते निलेश निकम (Nilesh Nolan) यांनी विरोध केला आहे. या मिळकतींना निवासी दराने प्रचलित धोरणा नुसार वार्षिक करपात्र रकमेची आकारणी करावी. अशी मागणी निकम यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

निकम यांच्या निवेदनानुसार पुणे हे शिक्षणाची पंढरी आहे व तसे दाखले पुणे शहरात असण्याच्या जुन्या व नव्या शैक्षणिक संस्था याची साक्ष देतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी इतर शहरातून, राज्यातून हजारो विद्यार्थी येत आहेत. नंतरच्या काळात परदेशी विद्यार्थी सुधा ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुणे शहरात येत आहेत. आजमितीला पुणे शहरात जवळपास पुणे शहराबाहेरील ३ ते ४ लाख विद्यार्थी शिक्षणानिमित्त / स्पर्धा परीक्षानिमित्त/ स्कील एज्युकेशन घेण्यानिमित्त पुणे शहरात व्यास्तव्य करीत आहेत. त्यांच्या वास्तव्यामुळे पुणे शहरात वर्षाकाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. सदरील उलाढाल अंदाजे ५००० ते ६००० कोटी प्रतिवर्षी याप्रमाणे होत आहे. असा अंदाज आहे. सदरच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांना, राहण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडे अपुरे वसतिगृह आहेत. (PMC Property tax Department)

निकम यांनी म्हटले आहे कि पुणेकरांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशा शैक्षणिक कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी निवासी व्यवस्था करून त्यांची राहण्याची सोय करून दिली आहे. त्या बदल्यात इतर भाडेकरूंकडून ज्या पद्धतीने घर भाड्याची आकारणी केली जाते त्याच पद्धतीने त्यांच्या कडून आकारणी केली जात आहे. सदर जागेचा वापर हा राहण्यसाठी निवासी पद्धतीने होत आहे. (PMC Pune News)
पुणे शहरातील निवासी मिळकतींना मालक स्वतः राहत असल्यास करपात्र रकमेत ४०% सवलत देण्यात येत आहे. व निवासी मिळकत निवासासाठी भाड्याने दिल्यास मिळकत करपात्र रक्कम हि पूर्ण आकारली जाऊन त्यावर मनपाने ठरवून दिलेला मिळकत कर, पाणीपट्टीसहीत आकारला जातो. यापूर्वी माहिती व तंत्रज्ञान (IT & ITES) मिळकतींना निवासी दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोजगार निर्माण व आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शैक्षणिक संस्था, हॉस्टेल यामध्ये राहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थामुळे या शहरात होत असलेली उलाढाल ही शहरात रोजगार निर्माण करणारी आहे. अनेक घरगुती व्यवसाय जसे खानावळ, छोटी छोटी हॉटेल्स, शैक्षणिक वस्तू पुरविणारे व्यवसाय, व दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक ही लोक पुणे शहरातील अनेक मिळकतींमध्ये पेईंग गेस्ट व भाडेकराराने राहत आहेत. अशा मिळकतींना पुणे म.न.पा. ने व्यावसायिक दराने ( बिगरघरगुती) वार्षिककरपात्र रक्कम आकारल्यास तब्बल अडीच पट ते तिप्पट दराने वार्षिक करपात्र रकमेत वाढ होणार आहे. पर्यायाने जागामालकास सदर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या जागेच्या भाड्यात वाढ करावी लागणार आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसून त्याचा आर्थिक भर सोसावा लागणार आहे. निवासी मिळकतींमध्ये विद्यार्थी महिन्याचे भाडे ठरवून राहतात किंवा पेईंग गेस्ट म्हणून महिन्याचे भाडे ठरवून राहतात. त्यांचा वापर हा निवासी आहे. हॉस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी सुद्धा निवासासाठी त्याचा वापर करतात, त्यामुळे निवासासाठी वापरणाऱ्या मिळकतींना चालू धोरणानुसार कर आकारणी करावी. ज्यामध्ये हॉस्टेल मध्ये असणारी मेस, कॅन्टीन, दुकान, लॉन्ड्री आहेत त्या वापरापुरता व्यापारी दर लावणे योग्य ठरेल.
आमची मागणी आहे की, हॉस्टेल, पेईंग गेस्ट याचा वापर करण्याच्या व मासिक भाडे आकारणाऱ्या मिळकतींना निवासी दराने प्रचलित धोरणा नुसार वार्षिक करपात्र रकमेची आकारणी करावी. तरी, प्रशासनाने मा. स्थायी समिती पुणे मनपा च्या मान्येतेसाठी ठेवण्यात आलेला पुणे शहरातील
हॉस्टेल, पेईंगगेस्ट, गेस्ट हाउस, सर्विस अपार्टमेंट कर आकारणी बाबत चा विषय हा विद्यार्थी हित लक्षात घेऊन मागे घेण्यात यावा. असे निकम यांनी म्हटले आहे.
—-

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water cut on Thursday | गुरूवार  रोजी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा  दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा
केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्पीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..
जुने वारजे जलकेंद्र:- माळवाडी, विठठलनगर ज्ञानेश सोसायटी, अमरभारत सोसायटी, गणपतीमाथा परिसर, सहयोगनगर, गोकूळनगर पठार, अहिरेगाव, रामनगर, गणेशपुरी सोसायटी, पॉप्युलर कॉलनी व इतर
गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन
गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती,
कॅनॉल रोड, राम नगर, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
चतुश्रुंगी टाकी परिसर :- सकाळनगर औंधं रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी पाषाण निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध
उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्ती पर्यंत,बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इत्यादी.
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

Categories
Breaking News PMC social पुणे

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

| क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. ऐवजी 15 मी रुंदीचा केला जाणार

Old Pune New DP | मान्य विकास आराखड्यामध्ये (Pune Devlopment Plan)पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र यामुळे काही मिळकती बाधित होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी हा रस्ता 15 मी करण्याची मागणी केली होती. यावर राज्य सरकारने महापालिकेचा (PMC Pune) अभिप्राय मागवला होता. त्यानुसार महापालिकेने 15 मी रस्ता करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे.  (Pune Municipal Corporation)

अर्जदार श्री. दिलीप जोशी व इतर यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित केल्याने या रस्त्यावरील सन १७७४ साली बांधलेले वारसा यादीमध्ये असलेले पुण्यातील पुरातन लक्ष्मी नृसिंह मंदिराचा मोठा भाग रस्ता रुंदीकरणात जात आहे. सि.स.नं. १४२०, सदाशिव पेठ व त्यामुळे पुरातन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तू नष्ट होणार आहे. त्यामुळे सदरचा फडके रस्ता मान्य सुधारित विकास आराखडा (२००७-२७, सेक्टर-१, शीट क्र. ६ व ९) मध्ये प्रस्तावित करण्यात आलेला २४ मी. रस्ता रुंदी डीपी रद्द करून तो सन १९८७ च्या मंजूर आराखड्याप्रमाणे १५ मी. ठेवावा अशी मागणी संबंधितांनी केली आहे. त्यास अनुसरून अवर सचिव यांनी पुणे महानगरपालिकेचा अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. (PMC Pune News)

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (२००७-२७) शासनाने सन २०१७ मध्ये मंजूर केला आहे. सदर मान्य विकास आराखड्यामध्ये पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.  रस्ता हा दक्षिण दिशेला असून या रस्त्यावर पुरातन ऐतिहासिक लक्ष्मी नृसिंह मंदिर हे पश्चिमेकडे आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मी. रस्तारुंदीमध्ये सदर मंदिराचा गाभारा आहे. तो तसाच राहणार असून सभामंडप हा दक्षिणेकडील बाजूस ८ मी. ने व उत्तरेकडील बाजूस ९०६ मी. ने बाधित होत आहे. तसेच प्रस्तुत बाबत वारसा व्यवस्थापन विभाग यांचेकडील अभिप्राय  प्राप्त झाला असून “मान्य २०१७ डी.पी. मध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा रस्ता १५ मी. ऐवजी २४ मी. रुंदीचा केल्यास ग्रेड -१ दर्जाचे खुन्या मुरलीधर मंदिर व ग्रेड -२ दर्जाचे लक्ष्मी नृसिंह मंदिर या दोन्ही वास्तू बाधित होत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने खुन्या मुरलीधर मंदिर चौक ते खजिना विहीर चौक या संबंध रस्त्याची रस्तारुंदी रद्द करण्याची पुणे महानगरपालिकेच्या हेरीटेज कमिटीची शिफारस आहे.” असे कळविले आहे.
जागेवरील रस्त्याचे टोटल स्टेशन मशिनद्वारे सर्वेक्षण केले असता १५ मी. रस्तारुंदीमध्ये एकुण ३२मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये पुर्व बाजूकडील २१ व पश्चिम बाजूकडील ११ मिळकतींचा समावेश आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यामधील २४ मी. डीपी. रस्त्याने एकुण १२७ मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये रस्त्याचे पुर्व बाजूकडील ५८ व पश्चिम बाजूकडील ६९ मिळकतींचा समावेश होत आहे. त्यामुळे खुन्या मुरलीधर चौक ते खजिना विहीर चौक (श्रीधर स्वामी चौक) सदरचा रस्ता सन १९८७ चे मान्य डी.पी. नुसार १५ मी. कायम करणे असे कळविण्यात आले होते.

त्यानुसार सरकारने महापालिकेला कळवले होते कि, पुणे शहराच्या मूळ हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसारच्या खजिना विहीर चौक तेनागनाथपार चौक दरम्यानच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्त्याची रुंदी २४मी. ऐवजी १५ मी. पर्यंत कमी करण्यापेक्षा १८ मी. पर्यंत करणे शक्य आहे किंवा कसे? हे तपासावे व त्यानुसार, सदर रस्त्याची रुंदी १९८७ च्या मंजूर विकास योजनेनुसार १५ मी. अथवा १८ मी. करणेबाबत प्रस्ताव शासनास सादर केल्यास शासन त्यावर गुणवत्तेवर निर्णय घेईल. त्यानुसार महापालिकेने रस्ता 15 मी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आता शहर सुधारणा समिती समिती समोर ठेवण्यात आला आहे.

Urban 95 | PMC Kids Festival 2.0 | पुणे महानगरपालिकेच्या अर्बन९५ बालोत्सव २.० ला 1 लाखांहून अधिक पालक, शिक्षकांचा प्रतिसाद

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Urban 95 | PMC Kids Festival 2.0 | पुणे महानगरपालिकेच्या अर्बन९५ बालोत्सव २.० ला 1 लाखांहून अधिक पालक, शिक्षकांचा प्रतिसाद 

| चौथ्या दिवशी समारोप कार्यक्रम उत्साहात साजरा 

Urban 95 | PMC Kids Festival 2.0 | पुणे | रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने, या उत्सवाच्या चौथ्या म्हणजे शेवटच्या दिवशी मुलांचा किलबिलाट सारसबागेमध्ये (Sarasbaugh)  अनुभवायला मिळाला. या बालोत्सवात ०,००० पेक्षा जास्त मुले आणि १,००,००० पेक्षा जास्त पालक, सांभाळकर्ते आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Pune Municipal Corporation) 

आजच्या दिवसाच्या सुरुवातिला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी सहकुटुंब बालोत्सवाला भेट दिलीत्यांच्या सोबत लोकप्रिय रेडियो जॉकी संग्राम खोपडे यांनी सुद्धा सहभाग घेतला, आणि मुलं व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक स्टॉल आणि आयोजित कार्यक्रमाला भेट दिली आणि माहिती घेतली. 

४ दिवसाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एस. एन. डी. टी. कॉलेज, एम.आय.टी. कॉलेज, भारती विद्यापीठ संस्थेतील स्वयं सेवकांचे सहकार्य दिसून आले. नॅशनल कॅडेट कॉर्प्स च्या ७५ स्वयंसेवकांनी सुद्धा बलॉत्सवामध्ये राष्ट्रध्वज घेऊन परेड केली आणि सर्व सहभागी हजारो पालक मुलांसोबत राष्ट्रगीत गाऊन वातावरणात चैतन्य निर्माण केले. आलाना आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या आत मुलांच्या शारीरिक खेळांसाठी रंगीबेरंगी आणि आकारांचा मजेदार प्ले एरिया विकसित केला. (PMC Pune Balotsav 2.0)

पेरेंट्स प्लस या उपक्रमांतर्गत टीम ने एकूण ३८ सूक्ष्म आणि स्थूल स्नायू विकासबौद्धिक विकासभाषा विकाससंवेनशीलता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकास टप्प्यांवर काम करणाऱ्या आयोजित खेळांचा मुलांनी आस्वाद घेतला. पालकांना पेरेंट्स प्लस च्या स्टॉल वरील घरगुती वस्तूंचा वापरून तयार केलेली खेळणी अतिशय आवडली. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ही खेळणी कशी उपायुक्त आहेत याबाबत माहिती पालकांना अशी खेळणी घरी तयार करून मुलांसोबत खेळण्याचे आव्हान केले. (Pune PMC News) 

या चार दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण ४० स्वयंसेवी संस्था आणि सरकारी विभागांनी बाल विकासासंदर्भात २५० पेक्षा अधिक खेळ आणि बालविकास निगडीत कार्यक्रम मुले व पालकांनी अनुभवले.

व्हॅन लीर फाऊंडेशन तर्फे पुणे शहाराव्यातीरिक्त उदयपुर शहरामध्ये सुद्धा अर्बन95 उपक्रम राबवला जात आहे. उदयपुर नगर निगम च्या प्रतिनिधिनी उदयपूर मध्ये विकसित होत असलेल्या बालकेंद्री उपक्रमांची माहिती सर्वाना दिली. 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने व व्हॅन लीर फाऊंडेशनमार्गदर्शनाखाली तांत्रिक प्रकल्प सल्लागार इजिस इंडियाने या कार्यक्रमाची आखणी, आयोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली यात आगाखान फाऊंडेशन यांनी विशेष सहकार्य केले. 

औद्योगिक सुरक्षा बलाचे कमांडंट सुमंत कुमार (CISF) यांनीसुद्धाभेट दिली. संध्याकाळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे समारोप समारंभामध्ये सहभागी झाले. 

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणेम्हणाले: या उपक्रमाला यशस्वीरित्या राबवण्यासाठी मी सहभागी झालेल्या सर्व मुलांचे, पालकांचे, शाळांचे, शिक्षकांचे आणि सांभाळकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग मोलाचा आहे.”

अर्बन९५ बद्दल:  अर्बन९५हा बर्नार्ड व्हॅन लीर फाऊंडेशनने २०१६मध्ये लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्यासाठी तयार केलेलाएक उपक्रम आहेया उपक्रमाच्या केंद्रस्थानी प्रश्न आहे “जरतुम्ही ९५ सेंटीमीटर ऊंचीपासून शहराचा अनुभव घेऊ शकलातरतुम्ही काय बदलाल?” शहराचे नेतेनियोजकवास्तुविशारदआणि प्रशासनासोबत काम करून,जगभरातील शहरांतीलविकास धोरणांच्या केंद्रस्थानी ‘बालविकास म्हणजे सर्वांचाविकास’ हा दृष्टीकोन आणण्यात मदत करत आहे.

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

| अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती

PMC Engineering Cadre Promotion | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यामध्ये 25% भरती रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये अभियांत्रिकी वर्गाला पूर्णपणे न्याय देण्यात आला असून लेखनिकी संवर्गाच्या संधी मात्र एक प्रकारे हिरावून घेतल्या जात आहेत. (PMC Employees Promotion)
पुणे महापालिका आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता वर्ग 1 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी), उप अभियंता वर्ग 2 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता वर्ग 3 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) या पदांच्या नेमणुकीत बदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी -छापवाले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
यानुसार कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. वास्तविक सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. मात्र पदोन्नती साठी JE ना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी 5 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सेवकांवर यामुळे अन्याय होणार आहे. कारण 5 वर्ष अनुभव असलेला नवीन सेवक देखील पदोन्नती घेऊ शकणार आहे. मात्र पदोन्नती घेण्यासाठी ऐन वेळेला पदव्या घेणाऱ्या लोकांवर यामुळे चाप बसणार आहे. (Pune PMC)
अभियांत्रिकी सेवा वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यासाठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यातील 25% भरती अर्थात नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे. यातील 75% पदोन्नती ही पदवी धारण करणाऱ्यासाठी असेल तर 25% पदोन्नती पदविका धारण करणाऱ्यासाठी असेल. यासाठी 3 वर्षाची नियमित सेवा आवश्यक असणार आहे. (PMC Pune Marathi News)
दरम्यान या दुरुस्त्या केल्याने अभियांत्रिकी संवर्गचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच नवीन भरती देखील होऊ शकणार आहे. मात्र यामुळे लेखनिकी संवर्गाचे नुकसान होणार आहे, असे बोलले जात आहे. कारण अभियांत्रिकी संवर्गातील लोक लेखनिकी संवर्गात येऊ शकतील. ते क्षेत्रीय अधिकारी होऊ शकतील. मात्र लेखनिकी संवर्गातील लोकांना मात्र त्यामानाने कमी संधी मिळणार आहे. याबाबत प्रशासनाकडून कुठली काळजी घेण्यात आलेली नाही.

PMC Disaster Management | Rishikesh Balgude | पुणे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा राम भरोसे! | यंत्रणा सुधारण्याची ऋषिकेश बालगुडे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Disaster Management | Rishikesh Balgude | पुणे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा राम भरोसे! | यंत्रणा सुधारण्याची ऋषिकेश बालगुडे यांची मागणी

                                                                                                                                                              PMC Disaster Management | पुणे | पुणे मनपा मुख्य  इमारत (PMC Main Building), शहरातील मनपाचे दवाखाना, शाळा, महाविदयालय येथील अग्निसुरक्षा व आपत्कालीन व्यवस्था याकडे महापालिका प्रशासन  दुर्लक्ष करते. असा आरोप काँग्रेस चे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे (Rishikesh Balgude) यांनी केला आहे. या यंत्रणा सुधारण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)
बालगुडे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका मध्ये दररोज हजारो नागरीक कामानिमित्त  येत असतात. मनपा कर्मचारी,अधिकारी वर्ग  प्रत्येक विभागात कार्यरत असतात. मनपा मुख्य ईमारत आणि जुनी इमारती मध्ये अग्निरोधक यंत्रणेची मुदत संपून गेलेली आहे.  तरी महानगरपालिका भवन विभाग आणि आपत्कालीन विभाग सेवा रामभरोसे झाली आहे. अग्निरोधक यंत्रणा बाबत  नियमाप्रमाणे  अग्निशामक यंत्रणा तपासणी हि साधारणपणे  ६ महिन्यांनी होणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता मनपा च्या शहरातील विविध ईमारती त्यामध्ये शाळा, हॉस्पिटल, कार्यालय यामध्ये अग्निशामक यंत्रणा हि कुचकामी असल्याचे यातून स्पष्टपणे उघड होते. येथे येणाऱ्या lनागरिकांची,विद्यार्थ्यांची काळजी पुणे मनपा ला नाही का? काही घटना घडल्यास जवाबदार कोण?   असा प्रश्न बालगुडे यांनी विचारला आहे. (PMC Pune News)
                                                                                            तसेच मनपाच्या ईमारतीमध्ये मध्यंतरी लिफ्ट सुद्धा बंद पडली होती. त्यामध्ये मनपा अधिकारी, कर्मचारी, नागरीक सुद्धा अडकलेले होते. काही वेळानी या अडकलेल्याना काढण्यात आले. आज सुद्धा या लिफ्ट दुरावस्थामध्ये आहे. तरी याविषयी आपण तातडीने संबंधित विभागांना आदेश देऊन या सर्व यंत्रणा  सुधारणा करून चालू करण्यात याव्यात. या विषयाचा अहवाल आम्हाला मिळावा. अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
    —–