NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती

 

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या मान्यतेने माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

NCP Youth Kothrud | समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम १९७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५ (२) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले.

या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या….

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

| आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत  पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family |   “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

– बारामतीतून शुभेच्छा देण्याची पवार कुटुंबाची परंपरा

दिवाळी पाडवा म्हटलं कि पवार कुटुंब आणि बारामती हमखास आठवते. कारण पाडव्या दिवशी पवार कुटुंबीय  बारामतीतून नागरिकांना शुभेच्छा देत असतात. महाराष्ट्र भरातून लोक पवार कुटुंबाना भेटायला जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच पूर्ण परिवार एकत्र येऊन शुभेच्छा देत असतात. मात्र यंदाचा पाडवा वेगळा आहे. कारण अजित पवार हे परिवार आणि पक्ष सोडून भाजपच्या सत्तेत सामील झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी पक्ष कुणाच्या मालकीचा यावरून देखील पवार काका पुतण्यामध्ये वाद सुरु आहेत. त्यामुळे यंदा बारामतीतून शरद पवार यांनी पाडव्याला नागरिकांना शुभेच्छा दिल्या तरी अजित पवार हे त्यांच्यासोबत नसणार आहेत. यामुळे नागरिक आणि कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज आहेत.

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | रोहित पवारांना वाटते मीच वारसदार! | चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Rohit Pawar | Chandrashekhar Bawankule | अजित पवार (Ajit Pawar) आमच्याकडे आल्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांना संधी दिसू लागली असून शरद पवारांचा (Sharad Pawar) वारसदार आहे, असे वाटू लागले असावे. असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. अर्थहिन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही. असेही बावनकुळे म्हणाले.

 

ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आमदार गोपीनाथ पडळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे असे सांगून पडळकर यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले.

प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावी ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायलयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही. असे बावनकुळे म्हणाले.

संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीच्या लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.

• प्लॅन बी कशाला?

विरोधकांना काहीच सूचत नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपाकडे कोणताच प्लॅन बी नसून त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य ४५ हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. मोदीजींच्या कामांमुळे सर्व त्यांच्याकडे पाहूनच मते देणार आहे. असे हि बावनकुळे म्हणाले.

 

Chagan Bhujbal | NCP Pune | छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे राष्टवादीकडून निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Chagan Bhujbal | NCP Pune | छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे राष्टवादीकडून निषेध आंदोलन

Chagan Bhujbal | NCP Pune | शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपहार्य टिका- टिपण्णी करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शनिपार येथे निषेध आंदोलन केले. (Chagan Bhujbal | NCP Pune)
“छगन भुजबळ यांचा निषेध असो” , भुजबळाचा बैलाला घो.. , “बेईमान बेईमान ….छगन बेईमान”अशा घोषणांनी संपूर्ण शनिपार परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की,”छगन भुजबळ नावाच्या व्यक्तीला कित्येक वेळा राजकीय अडचणीच्या काळात लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी मदतीचा हात दिला,त्यांचे पुनर्वसन केले, त्यांना मंत्री केले , त्यांच्या पुतण्याला खासदार केले, अशी मेहेरबानी दाखवली असताना देखील छगन भुजबळ यांनी वाचाळगिरी करत आपण किती चांगल्या स्वरूपाचे गद्दार आहोत, याचे प्रदर्शन काल बीड येथे झालेल्या जाहीर सभेत केले.  चार वर्षांपूर्वी जेव्हा छगन भुजबळ यांना जेलमध्ये असह्य वेदना होत होत्या, त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करत छगन भुजबळ यांचा जामीन करून घेतला होता. परंतु छगन भुजबळ यांनी या सर्व गोष्टी विसरून राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे. भविष्यकाळात जर पुन्हा छगन भुजबळ यांनी आदरणीय साहेबांबद्दल अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली तर  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा योग्य समाचार घेणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अंकुश काकडे,मृणालिनी वाणी,गणेश नलावडे,,सुषमा सातपुते,दिपक जगताप,भूषण बधे ,सारिका पारेख,
अप्पा जाधव, पायल चव्हाण,राजेंद्र आलमखाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आदी पदाधिकारी उपस्थित होते.

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत. यावरून कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (PMC Pune Employees | Sharad Pawar)
पुणे महापालिका कर्मचारी (Pune Municipal Corporation Employees) प्रशासनाच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करत आहेत. याला कारण म्हणजे प्रशासनाचा उदासीनपणा. कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या, कालबद्ध पदोन्नती, सहायक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत बदल करणे, लेखनिकी संवर्गावर अन्याय करणे, अशा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. याबाबत कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांची मोदीबाग या ठिकाणी बजरंग पोखरकर – अद्यक्ष पीएमसी एम्प्लॉईज पुणे महानगरपालिका (PMC Employees Union) व राजु ढाकणे जॉईंट सेक्रेटरी यांनी भेट घेऊन पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच जुनी पेंशन योजना लागु करा, अशी मागणी देखील केली. शरद पवार कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. (Pune Municipal Corporation News)
—–/
News Title | PMC Pune Employees | Sharad Pawar Complaints of Pune Municipal employees’ problems directly to Sharad Pawar!

Lokmanya Tilak National Award 2023 | यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर  | शरद पवार यांच्या उपस्थितीत दिला जाणार पुरस्कार

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

Lokmanya Tilak National Award 2023 | यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर

| शरद पवार यांच्या उपस्थितीत दिला जाणार पुरस्कार

 

Lokmanya Tilak National Award 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (Lokmanya Tilak Smarak Trust) वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. अशी माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक (Dr Rohit Tilak) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Tilak Maharashtra Vidyapeeth (TMV)) प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे.

सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar), ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे (Trustee Sushilkumar Shinde) यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. असे टिळक यांनी सांगितले.

टिळक यांनी पुढे सांगितले कि, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३ पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (Lokmanya Tilak National Award)

लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत स्वदेशी हा महत्त्वाचा भाग आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उद्योगांच्या प्रगतीला नवी दिशा दिली, याकडे डॉ. रोहित टिळक यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्‍क आहे’, अशी सिंहगर्जना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकासासाठी सुराज्याची व्यक्‍त केलेली गरज आणि त्यासाठी आखलेली धोरणे, हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल होय. समाजातील गरीब, अतिगरीब, असुरक्षित आणि उपेक्षितांकरता सुराज्य आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत, या धोरणांद्वारे पंतप्रधान मोदी यांनी मानव केंद्रित दृष्टीकोनातून विकासावर भर दिला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घडविलेला गुजरातचा विकास सर्वांसाठी आदर्श ठरला.

भारत जेव्हा ब्रिटिशांच्या साखळदंडात जखडला होता, तेव्हा लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचा जयघोष करीत देशाला आर्थिक शक्‍ती बनविण्याची भूमिका मांडली, याकडे लक्ष वेधून डॉ. रोहित टिळक म्हणाले, आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता यावर पंतप्रधान मोदी यांंनी लक्ष केंद्रित केले आहे. ही काळाची गरज होती. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी मोदी सरकारने विविध सुधारणा केल्या. यातून उद्योजक-व्यावसायीकांना व्यवसाय करणे सोपे झाले. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेद्वारा गुंतवणुकीला चालना मिळाली आहे, बौद्धिक हक्क संपदेचे रक्षण, उत्पादनासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार यांसह अनेक घटकांमुळे प्रगतीचे नवे टप्पे पार करता येतील. 2014 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा दहावा क्रमांक होता. आता तिने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. येत्या काळात ती आणखी उंची गाठेल.

जोपर्यंत नागरिकांची नाळ संस्कृतीच्या मुळाशी जुळत नाही, तोपर्यंत कोणताही समाज फुलत नाही. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. या उत्सवांतून जागृतीबरोबरच भारतीयांमध्ये सांस्कृतिक संवेदना जागृत होण्यास मदत मिळाली. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदी यांनी संस्कृतीला सर्वोच्च स्थान दिले आहे. काशी, केदारनाथ आणि अयोध्या येथील कामे त्याची प्रचीती देतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अपरिचित नायकांची माहिती घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी आदिवासी संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला. 15 नोव्हेंबर हा ‘जनजातीय गौरव दिवस’ घोषित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंच तीर्थाचा विकास करण्याचे ठरवले. ही बाब त्यांच्या विशाल दृष्टीचे उदाहरण ठरले आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉर खुला करून सांस्कृतिक पाळेमुळे अधिक बळकट केली.

गेल्या नऊ वर्षांत भारताच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. जग भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. जग मानवासाठी अधिक अनुकूल बनविण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संपूर्ण विश्‍वाला वाटू लागले आहे. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याचे ठरवले, असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, कोरोनाच्या महासंकटात त्यांच्या दूरदर्शी धोरणामुळे 140 कोटी देशवासीयांना कोणत्याही अडथळ्याविना लस उपलब्ध झाली. याचबरोबर कोरोनावरील भारतीय लशीमुळे जगातील अनेक देशांना मदतीचा हात मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने आखलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे. यातून बेरोजगारीची समस्या लक्षणीयरीत्या कमी होईल. लोकमान्य टिळकांनीदेखील कौशल्य विकास शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. या शिक्षणातून रोजगार वाढेल हा त्यांचा विश्वास होता. याच भूमिकेतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांची आर्थिक क्षमता वाढावी यासाठी त्यांनी तळेगावात काच कारखाना उभारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. स्वतंत्र भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून 26 मे 2014 रोजी त्यांनी शपथ घेतली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशातील नागरिकांच्या मनात त्यांनी जागविलेल्या देशप्रेमाच्या भावनेमुळे देश आज आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करीत आहे.


News Title |This year’s Lokmanya Tilak National Award was announced to Prime Minister Narendra Modi | The award will be given in the presence of Sharad Pawar

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी | पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी

| पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस!

Deepak Mankar | Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (NCP Ajit Pawar Camp) गटाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर (City President Deepak Mankar)!यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील  तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी तसे पत्र मानकर यांना दिले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर यांनी सांगितले कि या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Deepak Mankar | Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याची जबाबदारी माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor of PMC Deepak Mankar) यांच्याकडे दिली आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. असे असले तरी जगताप हे शरद पवार यांना समर्थन देत आहेत. तर दीपक मानकर हे अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. (NCP Crisis)

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच बहुमताने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाकडून नवीन नेमणुका करण्याचे काम जोरदार सुरु आहे. (NCP Pune Ajit Pawar Camp)

त्यात पुण्यात मानकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी (thekarbhari.com) बोलताना नवनियुक्त शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले कि, या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. शहरातील प्रश्नाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. खासकरून नागरी सुविधा युवा वर्गाच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली जाणार आहे. तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार काम सुरु केले जाणार आहे. लवकरच शहराची कार्यकारिणी देखील तयार केली जाईल. अजित पवार हे 8 जुलै ला पुण्यात येणार आहेत. यावेळी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

—-

News Title | Deepak Mankar Ajit Pawar Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar Mankar intends to emphasize party building!

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

NCP Pune | Sharad Pawar | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP Pune) २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. (NCP Pune | Sharad Pawar)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी सांगितले कि,  या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले. यात प्रामुख्याने  खासदार शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे. (NCP Pune News)


या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते  पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व  पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत. (Sharad Pawar News)

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील. असेही जगताप यावेळी म्हणाले.

या बैठकीला खासदार वंदनाताई चव्हाण,ज्येष्ठ नेते माजी आमदार  जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, कमल ढोले पाटील, अंकुशआण्णा काकडे, माजी महापौर .शांतीलाल सुरतवाला, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, रवींद्रआण्णा माळवदकर, माजी उपमहापौर निलेश मगर, निलेश निकम, दिपालीताई धुमाळ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप, मा.नगरसेवक सतीश म्हस्के,काकासाहेब चव्हाण,प्रदीप गायकवाड,बाळासाहेब धनकवडे,श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर,संतोष फरांदे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवती अध्यक्ष सुषमा सातपुते,महिला अध्यक्षा मृणालिनीताई वाणी , मा.जि.सदस्य सौ.अनिताताई इंगळे, यांच्यासह सर्व सेलचे शहराध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News)


News Title | NCP Pune | Sharad Pawar Pune Nationalist Congress with Sharad Pawar Resolution passed in executive meeting

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण कुठल्याही प्रकारे व्यथित झाले नसल्याचे सांगत पुन्हा काम करण्याचा हुरूप आला आहे, असं स्पष्ट केलं. तसेच पक्षाचा आश्वासक चेहरा देखील शरद पवार असतील, असं पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम असेल, असे पवार यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar | Maharashtra Political Crisis)
 पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. (Maharashtra News)
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. असा टोला शरद पवार यांनी लगावला. (Maharashtra Politics)
पवार पुढे म्हणाले, आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.
चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत.
आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील. असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
News Title | Sharad Pawar Maharashtra Political Crisis | Now for the support of the people of Maharashtra, my Ekkalami program | Sharad Pawar