Senate Election | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध | महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध

| महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

| विद्यापीठाच्या निवडणुकीत पहिलीच घटना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधीसभेवर विद्यापीठ विकास मंचाच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

संस्थाचालकांच्या खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, श्री. अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे.

विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पांडे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ गजानन एकबोटे,
डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ अपूर्व हिरे, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. नितीन ठाकरे, डॉ संदीप कदम, अभाविप चेप्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान हा महाविकास आघाडी साठी धक्का मानला जातोय. कारण महाविकास आघाडी यासाठी जोरदार प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यभर दौरे देखील होत आहेत. असे असताना विद्यापीठ विकास मंचने जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पहिल्यापासूनच या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्याला हवे ते उमेदवार उभे करू दिले नाहीत, अशी कॉंग्रेस ची भावना आहे. त्यामुळे प्रचारात देखील कॉंग्रेस ने हिरीरीने भाग घेतलेला दिसत नाही.

दरम्यान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य निवडणूक कचेरीचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी भवन येथे करणार आहेत.

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray | पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

भारतीय निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह दिले आहे. तर पक्षाला  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाला नव्याने नाव मिळाल्याने पुण्यातील शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळयासमोर मशाल पेटवून आनंदोत्सव साजरा केला.

तर बंडखोर आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंधेरी तो झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है अशा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी मनपाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार सहित बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे म्हणाले की, शिवसेनेने ४० आमदाराना सर्व काही दिले. पण आज त्याच आमदारांनी बंडखोरी करून शिवसेनेच धनुष्यबाण गोठविण्याच पाप केल आहे.आता निवडणूक आयोगाने अंधेरी निवडणुकी करीता मशाल चिन्ह दिले आहे.पण आमचा आमच्या पक्षाचा इतिहास आहे.मशाल चिन्ह मिळाल्यानंतर तो उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतो आणि तो संदेश राज्यभरात जातो.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज्यात होणार्‍या निवडणुकीमध्ये बंडखोराना या मशालीच्या माध्यामातून जनता त्यांची जागा दाखवली जाईल,अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Murlidhar Mohol | बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड! | भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड!

| भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका

महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री. मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता पेंग्विन सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट श्री. मोहोळ यांनी केला.

मुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था केलेली पाहून कीव येते, असेही त्यांनी नमूद केले. ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही श्री. मोहोळ यांनी लगावला.

ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ताकाळात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही ते म्हणाले.

Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

भारतीय जनता पार्टीची (Bhartiya Janata Party) सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पुण्यातील सेनेचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात पुणे महाापलिकेत विकास कामांच्या अनेक योजना आल्या. मात्र, त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. या कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजना योग्यरित्या मार्गी लागू शकल्या नाहीत, असा शिवसेनेचा आरोप आहे.

महापालिकेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या सहकाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती. पुण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून तणावात भर पडत आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाला शिवसेनेच्या शहर पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन

शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांच्या २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.

त्या म्हणाल्या, ” शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष आपले काम आणि कार्य जोरदारपणे सुरू ठेवत आहे.”

आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी श्री गणेशांना उद्धवजीच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलोंचा मोदक डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी श्रींना अभिषेक केला आणि श्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा संघटक
राम गायकवाड, नितिन चांदेरे बाजार समिती सदस्य, उप शहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, संतोष गोपाळ, म्हाळुंगे गावचे युवा सरपंच मयुर भांडे, संजय गवळी, अविनाश मरळ, शादाब मुलाणी, स्वप्नील कुंजीर, धनंजय चौधरी, युवराज शिंगाडे, राजू विटकर, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, श्रुती नाझीरकर, स्वाती कथलकर, कविता आंब्रे, ज्योती चांदेरे, विद्या होडे, शर्मिला येवले, अनिता परदेशी, निकीता मारटकर, गायत्री गरुड आदी उपस्थित होते.

Shiv sainiks Pune | Uddhav Thackeray | पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पुण्यातील शिवसैनिकांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे.  सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

CM Mets PM | केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली  : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत  शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा | मुख्यमंत्री जनतेला काय म्हणाले?

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा | मुख्यमंत्री जनतेला काय म्हणाले?

मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फल्ोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार

Eknath Shinde Vs Shivsena | एकनाथ शिंदे यांचा सवाल  | दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…? 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा सवाल

| दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या निलंंबंनासाठी प्रयत्न केले जात आहेत, या दरम्यान सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, यादरम्यान एकनाथ शिंदेंचा गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. संजय राऊतांनी बंडखोर आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे, त्यांनी निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा थेट सवाल विचारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत गंभीर प्रश्न केले आहेत, त्यांनी म्हटले की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…

“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..”

CM Uddhav Thackeray | आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.या पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे असे काहीजण म्हणत आहेत, मी काय वेगळं केलं. प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले, ती शिवसेना देखील बाळासाहेबांच्या नंतरची आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले. मी शस्त्रक्रियेमुळे, आजारी असताना सर्वांशी संवाद ठेवणं शक्य नव्हते असे देखील त्यांनी यावेळी मान्य केलं.

| संजय राऊत यांचे ट्विट 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी होय संघर्ष करणार!! असे ट्वीट केले आहे.