NCP pune Against Inflation | राष्ट्रवादी काँग्रेसने भरवला मोदी महागाई बाजार

Categories
Breaking News Political पुणे

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन

पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.

पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.

केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते

Supriya Sule | Ajit Pawar | मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

: सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी 

पुणे : देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण केलं पण अजित पवार यांना भाषण करू दिले गेले नाही. त्यामुळं यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचं होतं, याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आलं नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळं हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथं भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करु द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणं लोहगाव विमानतळ ते देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाणं अजित दादांना हजर राहणार हा प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

देहू संस्थानने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, “हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.

Sunny Nimhan | सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा

Categories
Political पुणे

सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने प्रभाग क्र. १२ औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील ६ वी ते १० वी तील गरजू ३००० विद्यार्थ्यांना मोफत बॅग व शालेय साहित्य वाटप तसेच ६००० घरेलू महिला कामगारांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बॅग आणि शालेय साहित्य व छत्री वाटपाचे अनावरण करण्यात आले. या साठी विशेष सेवा सप्ताह अंतर्गत नाव नोंदणी केली जात आहे.

बॅग, छत्री आणि शालेय साहित्याचे अनावरण करताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सनी निम्हण यांनी अतीशय चांगला उपक्रम राबवित मला वाढदिवसाच्या सेवारुपी उपक्रम राबवून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे मला समाधान असून येणाऱ्या पुढील काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत असेच सेवारुपी कार्यक्रम राबवावे.

या विशेष सेवा सप्ताहची माहिती देताना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले की, साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील, यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशी मी मनोमन प्रार्थना आहे. त्यांच्या प्रत्येक कामात, निर्णयात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असतो म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 12 औंध, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना बॅग आणि शालेय साहित्य व घरेलू कामगार महिलांसाठी पावसाळी छत्री वाटप करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सेवा सप्ताह आयोजन केले असून 10 ते 17 जून या कालावधीत आपले नाव नोंदवावे. जेणेकरून आम्हाला या वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचवायला मदत होईल.

नोंदणी स्थळ:
शारदाताई पुलावळे (सरचिटणीस शिवाजीनगर, भाजपा महिला आघाडी),
शारदा एंटरप्रायजेस,
कस्तुरबा वसाहत, औध.

शॉप नं. 1
प्रथमेश अपार्टमेंट,
भैरवनाथ मंदिरासमोर, औंध गांव.

वनमालाताई कांबळे
वाल्मिकी मंदिरा शेजारी,
इंदिरा वसाहत, औध,

नोंदणी कालावधी
10 जून ते 17 जून 2022

Soniya Gandhi | Rahul Gandhi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसताना काँग्रेस अध्यक्षा, खा. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधीना बदनाम करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार दडपशाही करत आहे. परंतु, काँग्रेस त्यापुढे झुकणार नाही, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा निषेध मोहन जोशी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्यामागे गांधी कुटुंबियांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यातून ईडीमार्फत काँग्रेसचे नेते, खा. राहुलजींची चौकशी केली जात आहे. ही निव्वळ मनमानी आहे. नेहरु, गांधी कुटुंबाने स्वतःची संपत्ती देशाला दान दिली. देशासाठी बलिदान दिले. त्या कुटुंबाला ईडीमार्फत त्रास देणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, काश्मीरातील पंडितांची हत्या आणि पलायन या विषयांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार हे काँग्रेसच्या अध्यक्षा, खा. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधी यांच्यावर द्वेषभावनेतून कारवाई करत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

NCP Youth Vs BJP | काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी

कोथरूड मधील सिटी प्राइड मल्टिप्लेक्स येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गिरीश गुरूनानी यांनी काश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचा संदर्भ घेत भाजपा विरोधात बॅनरबाजी करत आंदोलन केले.

या वेळी माध्यमांशी बोलत असताना गिरीशी गुरनानी म्हणाले “भाजपा ने फक्त आणि फक्त मतांसाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाचे जोरात प्रमोशन केले होते. कुठे फुकट चित्रपट दाखविणे, तर कुठे दमदाटी करून चित्रपट लावणे अश्या अनेक प्रकारातून भाजपा या चित्रपटाला पाठिंबा देऊन द्वेषाचे राजकारण करत होते. पण आज जेव्हा काश्मीर मध्ये खरेच काश्मिरी पंडितांच्या एका पाठोपाठ एक अश्या निर्घृण हत्या होत आहेत तेव्हा मात्र भाजपा या वर काहीच अँक्शन घेताना दिसत नाही.” भाजपा चे जे नेते “द काश्मीर फाईल्स” चे तोंडभरून कौतुक करताना थकत नव्हते, आता काश्मिरी पंडितांच्या हत्यांवर एक चकार शब्दही काढत नाहीत अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली,  पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे ही गुरूनानी यांनी सांगितले. कंगना राणावत, आर्यन खान, हनुमान चालीसा, मशिदी वरचे भोंगे, ग्यानव्यापी मस्जिद इत्यादी मुद्दे भाजपा साठी जास्त महत्वाचे आहेत, पण काश्मिरी पंडितांचे प्राण नाही. त्यांच्या नेत्यांना लोकांच्या जीवांची काहीच काळजी दिसत नाही अशी घणाघाती टीका त्यांनी सत्ताधारी पक्षावर चढवली. जनतेला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे त्यांचे मत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे श्रीकांत बालघरे,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,रवी गडे,प्रीतम पायगुडे सामाजिक कार्यकर्ते राहुल खंदारे आदि उपस्थित होते.

PM modi pune tour | मोदींचा पुणे दौरा वादात | मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा 

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मोदींचा पुणे दौरा वादात | मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा

| राष्ट्रवादीकडून भाजपला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजे १४ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते देहू इथल्या तुकाराम मंदिराला भेट देणार असून तिथल्या शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. मात्र त्या आधीच हा दौरा वादात अडकला आहे.

मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक फलक लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टर्सवर पंतप्रधान मोदींचा फोटो विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोठा असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीका करत वारकरी सांप्रदायाचा अवमान केल्याची भावना व्यक्त केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात, “संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे. विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी.”

Now Target PMC | आता पुणे महापालिका | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा नारा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आता पुणे महापालिका | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा नारा

| कोथरूडमध्ये भाजपाचा विजयी जल्लोष

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!’ चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

भाजपा कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  पाटील यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्रबापू मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले.

ते पुढे म्हणाले की, “विजयानंतर काल माध्यमांशी बोलताना ‘ये तो बस्स झॉंकी हैं २० तारीख बाकी हैं,’ म्हटलं होतं. पण आज ‘ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌.

दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात आ. पाटील यांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला; आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच यानंतर आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांकडून दादांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

NCP Vs BJP | कमळ चिखलात फुलते गाळात नाही; पावसाने भाजपची चांगलीच पोलखोल | राष्ट्रवादीची टिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

कमळ चिखलात फुलते गाळात नाही; पावसाने भाजपची चांगलीच पोलखोल

| राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुखाची टिका

काल पुण्यामध्ये या वर्षीच्या पडलेल्या पहिल्याच पावसाने गेली पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपची चांगलीच पोलखोल केलेली आहे. काल संपुर्ण शहरभर रस्त्यांवर पाणी तुंबले होते, वाहतुक खोळंबली होती व पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाशवी बहुमताच्या बळावर पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर पुणे करांचे प्रश्न सोडवायचं सोडून सत्तेवर राहून फक्त कमिशनचा मलिदा खाणाऱ्या टेंडर मध्ये अडकलेल्या भाजपा मुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. असा आरोप राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

देशमुख म्हणाले, : शहराच्या ज्या मध्यवर्ती भागात भाजपाचे वर्षानुवर्षे प्राबल्य राहीलेलं आहे त्या भागाला तर छोट्या ओढया नाल्याचे स्वरूप आले होते. स्वत:च्या पक्षाचे खासदार , आमदार व सभागृह नेते , स्थायी समिती अघ्यक्ष व बहुसंख्य नगरसेवक जेथून निवडून येतात त्यांना येथील प्रशंनाकरीता दोन दिवसांपूर्वी आंदेलन करावे लागले. ह्यातच त्यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबूली दिलेली आहे व आपण सत्तेत बसण्यास लायक नाही हे त्यांनी मान्यच केले.

देशमुख पुढे म्हणाले, शहरतील सर्वात जास्त निधी ज्या भागात खर्च केला तेथेच ही परिस्थती असेल तर ह्यांच्या नगरसेवकाचे लक्ष कामात होते की मलई खाण्यात होते हे सर्व पुणेकरांना आता कळाले आहे. आचा-याने स्वत:च बनविलेल्या जेवनावर जेवणा-यांसमोर येवून ते किती खराब आहे हेच सांगण्यासारखा हा प्रकार आहे. एकीकडे ही कामे आम्ही केली असे लिहलेले बोर्ड व दुसरीकडे कामेच नाही झाली म्हणून आंदोलन करायचे. भाजपवाल्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत गटबाजीमध्ये पुणेकरांना ओढू नये येत्या मनपा निवडणूकीत पुणेकरांचे ठरले आहे हे त्यांनी निश्चित लक्षात ठेवावे. असे ही देशमुख म्हणाले.

Taslima nasreen | लेखिका तस्लिमा नसरीन यांचे वक्तव्य चर्चेत!

Categories
Breaking News social देश/विदेश

जर पैगंबर मुहम्मद आज हयात असते तर… लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन  भारतीय जनता पक्षाच्या आता निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेवरून सुरू असलेल्या वादात अडकल्या आहेत.  ट्विटरवर तस्लिमा नसरीन यांनी या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसक निदर्शनांचा निषेध केला.
 निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्यांद्वारे पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड प्रतिक्रिया आणि निषेधांवर व्यक्त केले आणि म्हटले की “जगभरातील मुस्लिम धर्मांधांचे वेडेपणा पाहून त्यांना धक्का बसला असेल”.
 तस्लिमा नसरीन यांच्या ‘लज्जा’ या पुस्तकावर बांगलादेशात तीव्र टीका झाल्यानंतर जवळपास तीन दशके निर्वासित जीवन जगत आहेत.
 59 वर्षीय नासरीन यांना  1994 मध्ये कट्टरवादी संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने बांगलादेश सोडावे लागले ज्यांनी तिच्यावर इस्लामविरोधी विचारांचा आरोप केला होता.
 जरी त्यांच्याकडे स्वीडिश नागरिकत्व आहे आणि गेली दोन दशके यूएस आणि युरोपमध्ये राहिली असल्या तरी, त्या बहुतेक लहान निवासी परवानग्यांवर भारतात आल्या आणि तिने कायमस्वरूपी देशात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि  सहकारी नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्यावरून देशभरात निदर्शने आणि कोलकाताजवळील हावडासह काही शहरांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन जण ठार झाले आणि डझनभरांना अटक झाली.
 दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या टिप्पण्यांमुळे भारत आणि परदेशात संताप निर्माण झाला आहे, अनेक पश्चिम आशियाई देशांनी जाहीर माफीची मागणी केली आहे, भारतीय राजदूतांना बोलावले आहे आणि भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
 भारताने त्यांना “केंद्रीय घटकांचे मत” म्हटले आहे परंतु त्यामुळे राजकारण्यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या भारतातील मुस्लिम गटांमधील संताप शांत झालेला नाही.
 गुरुवारी, दिल्लीतील पोलिसांनी सांगितले की त्यांनी शर्मा आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर “लोकांना फूट पाडण्यासाठी भडकावल्याबद्दल” तक्रार दाखल केली आहे.
 दोन नेत्यांविरुद्ध अंतर्गत कारवाई करून, भाजपने प्रतिनिधींना सार्वजनिक व्यासपीठांवर धर्माबद्दल बोलताना “अत्यंत सावध” राहण्याचे निर्देश दिले आहेत आणि ते कोणत्याही पंथ किंवा धर्माच्या अपमानास प्रोत्साहन देत नाही असे म्हटले आहे.

NCP Vs BJP | भाजपच्या माजी नगरसेवकाचा नामफलक ८ दिवसात हटवणार  | राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्धार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपच्या माजी नगरसेवकाचा नामफलक ८ दिवसात हटवणार

: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्धार

पुणे : कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपुरुषांची पुतळे- स्मारके यांवर संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावण्याचा जो लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे, तो त्वरित बंद करावा. पुणेकर व राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर लावण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नामफलकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत हे नामफलक हटविले गेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटविण्याचे काम करतील. असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर संकल्पना ही संकल्पनाच हद्दपार केली जाईल. तसा शब्दच आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना देणार आहोत.
पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी, नवीन आस्थापनांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर भाजपला अपयश आले आहे. कामापेक्षा दिखाऊपणा आणि चमकोगिरीवरच भर देण्याच्या भाजपच्या या प्रवृत्तीचा झालेला पर्दाफाश पुणेकरांनी पाहिला आहे. अलीकडे तर राष्ट्रपुरुषांची पुतळे – स्मारके यांपेक्षाही स्वत:चे कर्तृत्व मोठे असल्याचे भाजपकडून दाखवून दिले जात आहे. संकल्पनाच्या नावाखाली स्वत:चा डंका वाजवून घेण्याचा प्रकार घडत आहे. अलीकडेच ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यावर संकल्पनाच्या नावाखाली भाजपच्या एका माजी नगरसेविकेच्या सासूचे नामफलक लावण्यात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक खाली उतरवला. परंतु, भाजपने त्यातून काही धडा घेतलेले दिसत नाही.

सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाने संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत हे नामफलक हटविण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा ही संकल्पनेची संकल्पनाच आम्ही हद्दपार करणार आहोत.

आपण कोण, आपण काय संकल्पना राबवली आहे, याचा विचारच भाजपचे माजी नगरसेवक करताना दिसत नाहीत. मुळात ज्या कर्तृत्वाचा मान राखण्यासाठी महापुरुष, राष्ट्रपुरुषांची स्मारके, पुतळे उभारण्यात आली आहेत, त्या राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्यातील मावळे यांच्यापुढे आपली पात्रता काय, आपण संकल्पनाच्या नावाखाली काय दर्शवू पाहात आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती करणारे स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या निर्मितीच्या बदल्यात रायगडावर फक्त एक पायरी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जातील, तेव्हा त्यांच्या पायाची धूळ कायम आपल्या नावावर पडावी, एवढीच इंदुलकरांची इच्छा होती. रायगडाची निर्मिती करणाऱ्या इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी जागा हवी होती, तर भाजपचे हे माननीय मावळ्यांच्या, छत्रपतींच्या सरदारांच्या डोक्यावर स्वत:च्या नावाचा डंका वाजवत आहेत. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांबाबत भाजपला काय आदर आहे, याचे प्रदर्शन या ‘माननीयां’नी घडवून आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रकार कदापि सहन करणार नाही, हे भाजपने व माजी नगरसेवकांनी लक्षात घ्यावे. असेही जगताप म्हणाले.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, महेश हांडे, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, समीर पवार, प्रदीप शिवचरण, हेमंत गायवाड, विक्रम जाधव, शिवम इभाड, अभिजीत बारवकर, दिनेश खराडे, वैशाली थोपटे, श्वेता होनराव, सारिका पारेख, अनिता पवार, भावना पाटील, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, भक्ती कुंभार, ललिता मोरे, शालन उभे, मोनाली गोडसे, स्वाती जाधव, भक्ती कुंभार, तृप्ती पोकळे, मनीषा होते, उर्मिला गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.