NCP Pune | समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

 समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

समाविष्ट गावांमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे,नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे,एसटीपी प्लॅन्ट उभे करणे, पाणीपुरवठा योजना सुरू करणे, नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे , ही कामे तातडीने होणे गरजेचे आहेत. या समाविष्ट गावांमधील नागरिकांना या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राज्य सरकारकडे १० हजार कोटींची मागणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी कायमस्वरूपी व्यवस्था नाही,खासगी टँकरने होणारा पाणीपुरवठा, कचरा संकलन करण्यासाठी अपुरी व्यवस्था, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते, नागरिकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत अशी या समाविष्ट गावांची परिस्थिती आहे.

पुणे शहरात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी व इतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांनी या समाविष्ट गावांमधील सोसायटीमध्ये आपल्या सदनिका घेतल्या असून या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देण्यास पुणे महानगरपालिकेची सध्याची यंत्रणा कमी पडत आहे.

त्याचप्रमाणे पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघात होत असून हे खड्डे दुरुस्त करण्यात यावे , पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दर आठवड्यात किमान एक दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो ही परिस्थिती सुधारून 365 दिवस नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे, शहरात ठीक ठिकाणी दिसणारा कचरा राडाराडा याची विल्हेवाट लावत शहर स्वच्छ करणे, शहरातील मोकाट जनावरे कुत्री यांचा बंदोबस्त करणे, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या बिना वापर पडून आहेत या टाक्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन त्या वापरात आणणे व नागरिकांना नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करणे या मागणी देखील यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “पुणे शहरातील समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सदर निधी मिळणे अत्यंत गरजेचे असून याबाबत महाराष्ट्र आदरणीय विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहे. समाविष्ट गावांमध्ये सोयी सुविधा मिळाव्या हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका असून या गावांमध्ये सोयी सुविधा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, आमदार  सुनील टिंगरे, चेतन तुपे,अंकुश काकडे रवींद्र माळवदकर, दिपक मानकर,दिपाली धुमाळ,विशाल तांबे,अश्विनी कदम,महेंद्र पठारे, निलेश निकम,प्रदीप गायकवाड,काकासाहेब चव्हाण,श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

NCP Pune | पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन

गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा दृढ निश्चय देखील युवकांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Hadapsar Animal Hospital | विरोध होऊनही हडपसर प्राणी  हॉस्पिटलचा  प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर | महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा निर्णय

Categories
Breaking News PMC पुणे

विरोध होऊनही हडपसर प्राणी  हॉस्पिटलचा  प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर

| महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा निर्णय

पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत 30 वर्षाचा करार केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती ने मंजूर केल्यानंतर  या प्रकल्पांला विरोध वाढला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून आंदोलन देखील करण्यात आले होते. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि आमदार चेतन तुपे यामध्ये सहभागी झाले होते. असे असतानाही पुन्हा मुख्य सभेत प्रशासक विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी कोणते पाऊल उचलणार, हे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/ प्राणी अपघाताने जखमी किवां इतर कारणाने जखमी/आजारी झालेली असतात. अशा जखमी आजारी प्राण्याविषयी नागरिक व  सभासद आरोग्य खात्याकडे तक्रारी करत असतात. तसेच शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/प्राण्याची अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे मनपाच्या कुत्रा बंदोबस्त गाड्यामधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी आणलेली कुत्री हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं.५६ येथे मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल /दवाखान्यामध्ये घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कुत्र्यांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या कुत्र्यांवर/प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर याचा विरोध सुरु झाला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पांला विरोध केला होता. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार
मागणी केली होती कि त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सदर प्रकल्प महानगरपालिकेने हडपसर विधानसभा मतदान क्षेत्राच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत करावा. असे म्हटले होते.
२०१७ ते २०२२ या कालावधी मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये केशवनगर, रामटेकडी, उरूळी देवाची इ. ठिकाणी सुमारे २२०० मेट्रिकटनाचे नविन कचरा प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाने बहुमताने मंजुर करून घेतला आहे. त्यात
प्राण्यांच्या हॉस्पीटलची भर नको. अन्यथा या प्रकल्पा विरोधात कोर्टात दाद मागावी लागेल. असा इशारा ही त्यांनी दिला होता.
असे असतानाही पुन्हा मुख्य सभेत प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी कोणते पाऊल उचलणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

Categories
Uncategorized

 “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन

| पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

नवरात्रउत्सवाचे औचित्य साधून या वर्षी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बारामती टेक्सटाइलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्राताई पवार, स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या सहकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, भारती विद्यापीठ इंटरनॅशनल विभागाच्या डॉ. किर्ती महाजन, केसरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलच्या संचालिका झेलम चौबळ-पाटील, धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानव्ही धारिवाल, बीव्हीजी ग्रुपच्या संचालिका वैशाली गायकवाड, अभिनव फार्मर कल्बच्या पूजा ज्ञानेश्वर बोडके, पुणे महानगर पालिकेच्या मुख्य वित्त अधिकारी उल्का कळसकर यांचा सन्मान करणार येणार आहे. विशेष म्हणजे हा सन्मान ९ दिवस या ९ नवदुर्गांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी सांगितले आहे.

तसेच नवरात्रीच्या निमित्ताने पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी “सेल्फी विथ नवदुर्गा” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी नऊ दिवस आपले विविध वेशभूषांमधील देवी सोबतचे फोटो #selfiewithnavdurga या हॅशटॅगसह फेसबुक व इंस्टाग्राम वर पोस्ट करावयाचे आहे. तसेच हे फोटो ९१७२९५९२२२ / ९१७५२२८३३३ या क्रमांकावर व्हाट्सॲप देखील करायचे आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नऊ विजेत्यांना दररोज नऊ पैठण्या देण्यात येतील. असे एकूण ८१ पैठन्यांचे बक्षीस या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहे.

‘आपल्या महाराष्ट्राच्या भूमीची, इथल्या मातीची खास अशी ओळख आहे. भक्ती आणि शक्ती यांच्या स्पर्शाने या भूमीला, इथल्या मातीला आकार दिलेला आहे. विक्रम आणि वैराग्य जिथे एकत्र नांदते असे या भूमीचे खास वैशिष्ट्ये आहे. शूरवीर आणि संतांच्या मातीमध्ये जग घडविणाऱ्या स्त्रियांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे, ज्ञानदेवांची मुक्ताई, शिवबाची जिजाई, रणरागिनी लक्ष्मीबाई, जोतिबांची सावित्रीबाई आणि बाबासाहेबांची रमाई अशी महाराष्ट्राच्या मुलींची समृद्ध परंपरा आहे. अशा कितीतरी स्त्रियांनी स्वत:चं आयुष्य घडविलंच; पण त्याचबरोबर कुटुंबाला, समाजालाही घडविले. महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या अशा या ‘महाराष्ट्र कन्यारत्नांच्या समृद्ध खाणीतली अनमोल कन्यारत्न या सर्व महिला आहे. यांच्या सन्मान सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे या सन्मान कार्यक्रमामुळे समाजातील इतर मुलींना व महिलांना प्रेरणा मिळावी हा आहे.तसेच “सेल्फी विथ नवदुर्गा” या स्पर्धेच्या माध्यमातून घर बसल्या माझ्या सर्व माता भगिनींना शहर स्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.तरी पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे”,असे आवाहन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

| हॉस्पिटल हलवण्याची मागणी

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.

शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Animal Hospital | हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत 30 वर्षाचा करार केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलाहोता. याला समितीने मंजुरी दिली आहे. मात्र आता हडपसर मधून या प्रकल्पांला विरोध वाढला आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/ प्राणी अपघाताने जखमी किवां इतर कारणाने जखमी/आजारी झालेली असतात. अशा जखमी आजारी प्राण्याविषयी नागरिक व  सभासद आरोग्य खात्याकडे तक्रारी करत असतात. तसेच शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/प्राण्याची अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे मनपाच्या कुत्रा बंदोबस्त गाड्यामधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी आणलेली कुत्री हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं.५६ येथे मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल /दवाखान्यामध्ये घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कुत्र्यांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या कुत्र्यांवर/प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी  दिली आहे. मात्र आता याचा विरोध सुरु झाला आहे.

कोर्टात दाद मागणार | योगेश ससाणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पांला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार
पुणे महनगरपालिका व मिशन पॉसिबल यांच्या संयुक्त विदयमाने आपण नुक्ताच मंजुर केलेला प्राण्यांच्या हॉस्पीटलचा प्रकल्प सुमारे ३२१७ चौ.मी. या जागेवर ( भटक्या व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटल साठी सुमारे ३० वर्षासाठी संयुक्त प्रकल्पाला देण्यासाठी जो निर्णय झाला आहे. त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सदर प्रकल्प महानगरपालिकेने हडपसर विधानसभा मतदान
क्षेत्राच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत करावा.
२०१७ ते २०२२ या कालावधी मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये केशवनगर, रामटेकडी, उरूळी देवाची इ. ठिकाणी सुमारे २२०० मेट्रिकटनाचे नविन कचरा प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाने बहुमताने मंजुर करून घेतला आहे. त्यात
प्राण्यांच्या हॉस्पीटलची भर नको. तरी माझी आपणास विनंती आहे की, सदर हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट क्र. ५६ चे एकूण क्षेत्र ३२९७ चौ. मी ही मोकळी जागा प्राण्यांचे ( भटक्या
व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटलसाठी ३० वर्ष कालावधीसाठी संयुक्त प्रकल्प रद्द करावा. अन्यथा या प्रकल्पा विरोधात मला कोर्टात दाद मागावी लागेल. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..?

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये नेण्यात आला. राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्याचे हेतूने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प राज्यातून निघून गेल्यामुळे हतबल झालेले युवकांनी बुट पॉलिश करत, रद्दी विकत अभिनव स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेले आंदोलनास उपस्थित राहत युवकांच्या मागणीस पाठिंबा दर्शवला व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी युवकांनी यावेळी केली. वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. भाजपशासित गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केले आहेत , महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके ,प्रदीप गायकवाड ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर,उदय महाले,नानासाहेब नलावडे,भूषण बधे, गोविंद जाधव,कुलदीप शर्मा,अमोल ननावरे,राकेश कामठे ,महेश हांडे,मयूर गायकवाड,स्वप्निल जोशी,किरण खैरे ,गजानन लोंढे,पूजा काटकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.

Vedanta Foxconn Project | खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते | खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

Categories
Breaking News Commerce Political पुणे महाराष्ट्र

 खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते

|खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडिच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुनावले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी *‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ * अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की, वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातला हक्काचा वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरात मध्ये गेलेला आहे. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रोजगार यावा यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही. केंद्र सरकारशी चांगला संवाद असल्याचे सांगणारे सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र रोजगार आणण्यात अपयशी ठरले आहेत. गुजरात देखील भारताचेच एक राज्य आहे . तेथील जनता देखील आपलीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला पाण्यात बघत असून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक महत्वाची कार्यालये आणि प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले असून यामागे विशिष्ट शक्ती किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अदृश्य शक्तीशाली हात आहे. मुख्यमंत्री हे अतिशय स्वाभिमानी आहेत असे आम्हाला सांगितले जाते.त्यांनी आपला स्वाभिमानी मराठी बाणा जागृत करुन केंद्र सरकारला या कृत्याचा जाब विचारावा आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही देशमुख यांनी दिला.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, राजू साने , प्रदीप गायकवाड , महेश शिंदे , बाळासाहेब आहेर , सौ.सरीता काळे , कार्तीक थोटे , सौ.जयश्री त्रिभुवन .सौ.धनश्री कराळे सौ.निता गायकवाड, राजू खांदवे , सौ मंजुश्री गव्हाने व इतर प्रमुख मोठेया संख्येने उपस्थित होते.

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे

| राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलविण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज असून गरज पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका अशी खोचक टिपण्णी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील स प महाविधालय, टिळक रोड येथे आयोजित आंदोलनात सुप्रियाताई सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीपुढे न झुकण्याची राहिली आहे, परंतु सध्याच्या ईडी सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीच संस्कृती उदयास येत आहे असेही सुप्रियाताई म्हणाल्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. घोषणाबाजी करुन त्यांनी आसमंत दणाणून सोडला.
या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रात साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर खोके संस्कृतीचे पाईक असणाऱ्या ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे.

सदर आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपरोधिक पध्दतीने ढोल ,ताशे व नगारे वाजवून पुढील काळात राज्यातील मोठ मोठे उद्योग रोजगार जर असेच परराज्यात गेले तर आम्हाला फक्त दहीहंडी व इतर सभा समारंभा मध्ये सामील होवून ढोल वाजवणे एवढेच काम शिल्लक राहणार आहे त्याची आम्ही आतापासूनच तयारी सुरू केली आहे अशी उदिग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली
या सदर आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख सौ मृणालिनी वाणी,सौ अश्विनी कदम,दीपक जगताप,विक्रम जाधव,विशाल तांबे,संतोष नांगरे,नाना नलावडे , काका चव्हाण वैष्णवी सातव,रत्ना नाईक,अश्विनी भागवत ,मनीषा होले,रोहन पायगुडे , फईम शेख व इतर कार्यकर्ते मोठेया संख्येने उपस्थित होते.

NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Categories
Breaking News Uncategorized

बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था आदींच्या बाबतीतील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या समोर खरीखुरी बोट आणि ती वल्हवत ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साठले आहे. त्यातच अनेक ठिकाणी महापालिकेने कसलाही विचार न करता खोदकाम केले आहे. या खड्ड्यांमध्येही पाणी साठले असून भविष्यात येथेही एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या या नियोजनशून्य कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आहे याप्रंगी बोलताना ते म्हणाले की, भाजपाने गेली पाच वर्षांत अतिशय नियोजशून्य पद्धतीने कारभार करुन पुण्यासारख्या सुंदर शहराचे वाटोळे केले. शहरांतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठून शहराला एखाद्या तळ्याचे रुप आले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ही अतिशय दारुण अवस्था असून भाजपाने पुणे शहर अक्षरशः बुडविले आहे. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुण्यातील भाजपा नेत्यांनी हे शहर बकाल करुन खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही. याच शहरात स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले होते की, शहरांमध्ये गरीबीला पचविण्याची ताकद आहे. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. पण पुण्यातील भाजपा नेत्यांनी पायाभूत सुविधांसाठी आलेला पैसा गिळंकृत करुन आपली गरीबी पचविली. शहराच्या विकासाला तिलांजली दिल्यामुळे आता पुणेकरांना बस, रिक्षा किंवा मेट्रोची नाही तर बोटीची गरज पडणार असून पुण्यामध्ये भविष्यात बोट दाखवा, बोट थांबवा ही योजना केंद्र व राज्य सरकारने हाती घ्यायला हवी असा सल्ला देखील देशमुख यांनी दिला.

प्रवक्ते प्रदीप देशमुख , मूणालिनी वाणी ,विनोद पवार , उदय महाले , संतोष नांगरे ,भूषण बधे, वनिता जगताप , मंगल पवार , शालीनीताई जगताप , स्वप्निल जोशी , मीना पवार, भावना पाटील , सुरेश खाटपे, सुगंधा तिकोने व इतर प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते