Tag: PMC General Administration Department
PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
| 31 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार
३०/११/२०२० किंवा तत्पुर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व जे सेवक शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अ. माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, ब. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य, क. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ही पात्रता धारण करणाऱ्या सेवकांची माहिती सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांचेकडून विहीत नमुन्यामध्ये मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (Pune PMC News)
PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन
| कर्मचाऱ्यांना कायम करण्यास मंजूरी
पुणे महानगरपालिका (PMC Pune) क्षेत्रात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना (Social Welfare Schemes) तसेच, महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी या योजनेअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे महत्वाचे कामकाज समाज. विकास विभागामार्फत केले जाते. यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागात व्यवसाय गट ” मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समुपदेशक, समूहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्वावर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र या पदांची पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागास (PMCSocial Devlopment Department) आवश्यकता असल्याने, पुणे महानगरपालिका च्या वतीने या पदांची पदनिर्मिती करणे व त्या पदांवर या सेवकांना सामावून घेण्याबाबत मुख्य सभेने (PMC Général Body) मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी समाज विकास विभागात १८७ पदांची पदनिर्मितीस मंजूरी मिळणे व त्या पदांवर १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला होता. कारण पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या आकृतीबंध मध्ये या पदांचा समावेश नव्हता. त्यामुळे सदर पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. (PMC Pune News)
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडून दुजाभावाची वागणूक | रमेश शेलार यांचा आरोप
| अन्याय दूर करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी
PMC General Administration Department | बेहिशोबी मालमत्ता प्रकरण समान असताना फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे निलंबित करण्यात आलेले वर्ग- १ चे अधिकारी यांना उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांचेकडून वेगवेगळी वागणूक देण्यात येत आहे. असा आरोप पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) रमेश शेलार यांनी केला आहे. एका अधिकाऱ्याला कार्यकारी पद दिले जाते तर मला अकार्यकारी पद दिले जाते. त्यामुळे माझ्यावरील अन्याय दूर करावा. अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!
| महापालिका अधिकाऱ्यांना यावेळेस तरी मिळणार का पद?
DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!
उद्याच्या पदोन्नती समिती बैठकीतील पदे
PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!
| ही मागितली आहेत नवीन पदे
PMC Pune Education Department | शिक्षण विभाग समायोजन प्रक्रियेला वेग! | सामान्य प्रशासन विभागाने मागवली 18 पदांची सविस्तर माहिती
या पदांची मागवली आहे माहिती
प्रशासकीय अधिकारी (वर्ग 1), उपप्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), सहायक प्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), क्रीडाप्रमुख(वर्ग 2), पर्यवेक्षक (वर्ग 3), सहा. प्रशासकीय अधिकारी क्रीडा विभाग (वर्ग 2), शारीरिक शिक्षण संघटक (क्रीडा अधिकारी वर्ग 2), स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) (PMC Pune)
PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली!
| राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव
महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला आहे. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Employees)
– सामान्य प्रशासन विभागाचे सर्क्युलर जारी
शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. (7th Pay Commission Update)