Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा

| माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

Pune Water Cut | पुणे शहरात जो काही पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे. तो रद्द करावा  आणि पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे (Ex Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Cut)

डॉ धेंडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पावसाने ओढ दिल्यामुळे प्रत्येक गुरूवारी पुणे शहराचा पाणी कपातीचा निर्णय दिला होता. त्याला पुणेकरांनी सहकार्य केलेले आहे. परंतू गेल्या १५ दिवसामध्ये आपल्या धरणक्षेत्रामध्ये दमदार पाउस होत असून ६० टक्केच्या वरती धरण भरलेली आहेत. आणि खडकवासला धरणामधून नदीपात्रामध्ये विसर्गही

चालू झालेला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील २ महिने पाउस होणार असे प्रसिध्दीपत्रक दिलेले आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीबरोबर भामा आसखेड या धरणामध्ये देखील ६० टक्के धरण भरलेले आहे. (Pune Municipal Corporation)
भामा आसखेड मधून होणाऱ्या पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये गुरूवार नंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहत आहे. त्यामुळे नागरीकांना प्रचंड मनस्ताप व त्रास होत आहे. तरी पुणेकरांवरती जी काही पाणी कपात लादलेली आहे, ती रद्द करावी आणि पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. असे डॉ धेंडे यांनी म्हटले आहे. (Pune Rain)

—-
News Title |Pune Water Cut | Make sure that the people of Pune get water every day| Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s demand

PMC Pune Budget | नागरिकांनो महापालिकेच्या बजेट मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परिसरात 75 लाखापर्यंत कामे सुचवा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Budget | नागरिकांनो महापालिकेच्या बजेट मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परिसरात 75 लाखापर्यंत कामे सुचवा 

| 31 ऑगस्ट पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे

PMC Pune Budget | सन २००६-०७ पासून पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक (Pune Municipal Corporation Budget) तयार करताना नागरिकांच्या सूचनेनुसार आवश्यक कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे, असा उपक्रम पुणे शहरात सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2024-25 च्या बजेट मध्ये देखील नागरिक कामे सुचवू शकतात. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडून (PMC Ward Office) विनामूल्य अर्ज उपलब्ध करून दिले जातात.  हे अर्ज नागरिकांना online पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील. दरम्यान नागरिक यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत आपल्या प्रभागातील कामे सुचवू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Budget)
सन 2024-25  चे अंदाजपत्रक तयार करताना महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्तरावर नागरिकांकडून
त्यांच्या प्रभागात करावयाच्या कामांबाबतच्या सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रशासक तथा महापालिका आयुक्त (प्रभाग समिती अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक प्रस्तुत प्रयोजनाचे विचारार्थ बोलविण्यात यावी, त्या बैठकीमध्ये नागरिकांच्या अंदाजपत्रक सहभागाबाबत चर्चा घडवून आणावी. नागरिकांच्या सहभागातून अंदाजपत्रक तयार करणेबाबतचा प्रारूप कार्य आराखडा तयार करण्यात यावा. प्रभाग समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दैनिक वृत्तपत्रात जाहीर आवाहन करून नागरिकांकडून
कामाचे प्रस्ताव 31 ऑगस्ट अखेर मागविण्यात यावे. प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असल्यास त्या प्रभागास कमाल रक्कम रुपये ७५ लाख तसेच २ सदस्यांचा प्रभाग असल्यास कमाल रक्कम रुपये ५० लाखाची मर्यादा ठेवावी. तसेच एका कामाची रक्कम रुपये ५ लाखापेक्षा जास्त नसावी. नागरिकांकडून आलेले प्रस्ताव  प्रभाग समितीकडे अंतिमतः प्राधान्यक्रम ठरविणे व मान्यतेसाठी
पाठविण्यात यावे. तसेच प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व प्रभागाची एकवट माहिती, नियतकालिक अर्थसंकल्प विचारार्थ महापालिका आयुक्त यांचेकडे 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावी. असे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)
—–
News Title | PMC Pune Budget | Citizens participate in the municipal budget and suggest works up to 75 lakhs in your area

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

| वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार

Senior Citizens Health | PMC Health Department |  पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गंभीरपणे पाऊल उचलले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. तसेच महापालिकांच्या दवाखान्यामध्ये आठवड्यातून एक दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत राखीव ठेवला जाणार आहे. लवकरच याबाबत अंमल केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ भगवान पवार (PMC Health Department Chief Dr Bhagwan Pawar) यांनी दिली. (Senior Citizens Health | PMC Health Department)
शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal) आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्या पुढाकारातून ही बैठक घेण्यात आली. यावेळी उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpna Baliwant), सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav), समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas), प्रदीप धुमाळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मधुकर पवार, डि के जोशी, नंदकुमार बोधाई, गोपाळराव कुलकर्णी, दिलीप पवार; मुरलीधर रायबागकर, सौ माधुरी पवार व इतर अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
याबाबत डॉ पवार यांनी सांगितले कि, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश

आला होता कि ज्येष्ठ नागरिक संघ सोबत बैठक घ्या. त्यानुसार याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार संघांच्या मागणीनुसार या बैठकीत चर्चा झाली.  ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येईल.   तसेच ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी आठवड्यातून एक दिवस दिवस राखीव  ठेवला जाईल. त्यासाठी ज्येष्ठानी आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. तसे निर्देश संघाला दिले आहेत. तर उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांनी सांगितले कि या विषयावरून आधीच समाज विकास विभागा सोबत चर्चा करून धोरण करायचं ठरवलं होतं. ते धोरण तयार करून त्याचा मसुदा सर्व विभागांना पाठवला होता. सध्या हा मसुदा Pmpml कडे आहे. लवकरच समाज विकास विभाग याबाबत धोरण तयार करेल.
पुणे शहरांमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. हे ज्येष्ठ नागरिक संघ वर्षभर साहित्य, संगीत कला क्रीडा संदर्भात विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करून नागरिकांचे मनोरंजन करत असतात. या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये ज्येष्ठ सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य विषयक  सुविधा, आरोग्य चाचणी व अन्य सुविधा ज्येष्ठ नागरिक सभासदांना उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्याला प्रशासना कडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका. 
—-
News Title | Senior Citizens Health | PMC Health Department | Pune Municipal Corporation will take care of the health of the senior citizens of the city

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Health Minister Dr. Tanaji Sawant | कात्रज परिसरातील (Katraj Area) नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्यांचे सुशोभीकरण आणि लाईट व्यवस्था करण्यासाठी 3 कोटी 63 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Health Minister Dr. Tanaji Sawant)यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना दिले आहेत. (Health Minister Dr. Tanaji Sawant)
मंत्र्यांच्या पत्रानुसार कात्रज मोरे बाग परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार १. सरहद चौक ते कात्रज पार्लर – ३ ते वंडरसिटी बाह्यवळण मार्ग या रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभिकरण करणे, २. कात्रज पार्लर ३ ते सावंत विहार या रत्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण व सुशोभिकरण करणे ३. सावंत विहार फेज-३ ते अहिल्यादेवी होळकर उद्याण या रस्त्याचे कॉक्रिटीकरण, सुशोभिकरण व लाईट व्यवस्था करणे ही विकास कामे सन २०२३-२०२४ या अर्थसंकल्पीय वर्षात समाविष्ट  करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविणेत आलेले होते. तसेच या  कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविणेत आलेले होते. (PMC Road Department)

त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.२,८२, ८२, ७५३ /- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे तसेच विद्युत विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.८०,६७,३९४/- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे. (Pune Municipal Corporation)
तरी, विभागाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे उपरोक्त विकास कामास रक्कम रु.३,६३,५०,१४७/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PMC Pune)
News Title | Health Minister Dr. Tanaji Sawant Health Minister Dr Tanaji Sawant gave this order to Pune Municipal Commissioner

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी

| सुरक्षा विभागाकडून घेण्यात आल्या अजून 10 लोकांच्या मुलाखती

PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत 10 तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.  पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले जाणार आहे. नुकतेच 10 तृतीय पंथीयांना नोकरी दिल्यानंतर अजून 10 लोकांना कामावर घेतले जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये पीएचडी, एमटेक, बीएस्सी शिक्षण झालेल्या तृतीय पंथियांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तांच्या हस्ते लवकरच यांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)


पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करिता सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेचा उपक्रम समाजातील प्रत्येक घटकास न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असे राकेश विटकर म्हणाले.  (Pune Municipal Corporation News)
नवीन मुलाखती घेतलेल्या तृतिय पंथीयांचे उच्च शिक्षण झालेले आहे. काही ठिकाणी हे लोक नोकरी देखील करत होते. मात्र नोकरीच्या ठिकाणी होत असलेली हेळसांड पाहून या लोकांनी नोकऱ्या सोडणे पसन्त केले. त्यानुसार या लोकांनी महापालिकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आगामी काळात महापालिका देखील या लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार काम देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Pune Transgender Employees | P.hd, M.Tech will come in the service of Pune Municipal Corporation. B.Sc. yet 10 transgender

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेचा नगरविकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार!

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Katraj-Kondhwa Road | कात्रजकोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेचा नगरविकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार!

 

| तुकड्या तुकड्यात फक्त 30% काम पूर्ण 

 
Katraj-Kondhwa Road | पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले आहे. तुकड्या तुकड्या मध्ये फक्त 30% काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार करत 200 कोटी देण्याची मागणी केली आहे. पहिले पत्र 6 जुलै ला पाठवण्यात आले होते. तर नुकतेच 19 जुलै ला अजून एक पत्र पाठवण्यात आले आहे. (Katraj-Kondhwa Road) 

– उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 556 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. (PMC Pune News)

महापालिकेने काय म्हटले आहे पत्रात

 
 उप मुख्यमंत्री यांचे समवेत दिनांक १७/१०/२०२२ रोजी पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये उप मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाकडून निधी मिळणेबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मी. रूंदीचा विकास योजना रस्ता ( कात्रज कोंढवा) दर्शविलेला आहे. सदर ८४ मी. रूंदी पैकी सरासरी २० मी. रूंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. उर्वरीत रूंदीसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावरून मुंबई सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. सदरचा रस्ता विकसीत केल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. (Pune Municipal Corporation)
 रस्त्याच्या विकसनासाठी सन २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या असून ३१.१०.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या कामासाठी रक्कम रूपये १९२ कोटी (जीएसटी वगळून) खर्च येणार आहे. टी.डी. आर. पोटी ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता विकसनाचे काम झालेले आहे. तुकड्या तुकड्यामध्ये सुमारे ३० % रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादना अभावी रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. टी. डी. आर. चे दर कमी झाल्यामुळे रस्तारूंदीतील जागेसाठी रस्तारूंदीतील जागा मालकांकडून जागेच्या बदली रोख रकमेची मागणी करण्यात येत आहे. (PMC Pune News)
८४ मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रक्कम रूपये ५५६ कोटी खर्च अपेक्षित आहे. भूसंपादन व रस्ता विकसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे महापालिकेस अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ५० मी. रूंदीचा रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५० मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून 6 जुलै ला  विनंतीपत्र देण्यात आलेले आहे. (Pune News)
पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता महाराष्ट्र शासनाकडून १८५.४३ कोटी चा निधी मंजूर झालेला आहे व त्यानुसार काम सुरू आहे. प्रस्तुत कात्रज कोंढवा रस्ता मुंबई – सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्ड कडे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता अनुदान प्राप्त झाले त्याच धर्तीवर कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे काम प्राधान्याने करणेकरिता निधी मिळणेस विनंती आहे. या रस्त्याचे भूसंपादनाबाबत उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सोबत दिनांक १७/१०/२०२२ रोजी बैठकही झालेली आहे. तरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २०० कोटी निधी / अनुदान शासनाकडून सत्वर देण्यात यावे. असे पत्रात म्हटले आहे.
——–
News Title |

PMC Medical Camp | पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे केले जाणार आयोजन

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Medical Camp | पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे केले जाणार आयोजन

| महापालिका घनकचरा विभागाची माहिती

PMC Medical Camp |  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व Sancheti Institute for Orthopedics & Rehabilutation यांचे संयुक्त विद्यमाने डॉक्टर एच के संचेती यांचे वाढदिवसा निमित्त  22 जुलै रोजी शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालया मधील सफाई कर्मचार्‍यांसाठी Medical  Orthopedics Camp चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प  चे उदघाट्न प्रसंगी 165 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय (PMC Ward Offices) कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (PMC Medical Camp)
यामध्ये सेवकांचे Height, Weight, BMI, Hemogrm, Bone Mineral Density Diabetic Neuropathy Foot Checking,Orthopedic,
Consultation, Physiotherapy तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज )श्री रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ )डॉ. कुणाल खेमनार सर व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आशा राऊत  यांचे मार्गदर्शनाने करण्यात आले. संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर राहूल चौबे यांनी आयोजनाकरिता समन्वय साधला. हा खूपच चांगला उपक्रम असून भविष्यात तो पुणे महानगरपालिके मधील सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कोठी नुसार राबविण्यात येणार आहे. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Medical Camp | A medical camp will be organized for the cleaning staff of all the field offices of the Pune Municipality

PMC Pune Bharti 2023 | 9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Pune Bharti 2023 |   9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

PMC Pune Bharti 2023 |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. परीक्षेचे निकाल घोषित केल्यानंतर महापालिकेकडून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. नुकतीच फायरमन पदाची कागदपत्र पडताळणीची छाननी पूर्ण झाले.  उर्वरित सर्व पदांच्या कागदपत्र पडताळणीसाठी प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 27 जुलै, 28 जुलै आणि 1 ऑगस्ट या दिवशी पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. तसेच संबंधित दिवशी छाननी पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी स्वखर्चाने मुक्कामाच्या तयारीने यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनकडून करण्यात आले आहे. (PMC Pune Bharti 2023)
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. (PMC Pune Recruitment 2023)
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, औषध निर्माता या पदाच्या उमेदवाराच्या कागदपत्रांची छाननी 27 जुलै ला होणार आहे. जुना जीबी हॉल, डॉ आंबेडकर सभागृह येथे छाननी होईल. आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी 1 ऑगस्ट ला जुना जीबी हॉल मध्ये छाननी होईल. तर उप संचालक (प्राणी संग्रहालय), पशु वैदयकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदांसाठी 28 जुलै ला स्थायी समिती सभागृहात छाननी होईल. (Pune Mahanagarpalika Bharti 2023) 

—-
एका पदास तीन याप्रमाणेच उमेदवारांना बोलवण्यात आलेले असल्यामुळे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नवीन यादीत असलेल्या उमेदवारांनीच उपस्थित राहायचे  आहे.
 – सचिन इथापे, उपायुक्त, पुणे महापालिका 
—-
News Title | PMC Pune Bharti 2023 | The schedule for scrutinizing the documents of candidates for 9 posts has been announced by the Municipal Corporation

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर तर जनरल सेक्रेटरी पदी बापू पवार यांची बहुमताने निवड

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर तर जनरल सेक्रेटरी पदी बापू पवार यांची बहुमताने निवड

PMC Employees Union | पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी एम्पलाॅईज युनियनचे अध्यक्षपदी  बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) तर जनरल सेक्रेटरी म्हणून  बापू पवार (General Secretary Bapu Pawar) यांची युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने निवड करण्यात आली. (PMC Employees Union)
कार्याध्यक्ष म्हणून  वैशाली कुंभार यांची तर महिला कार्याध्यक्ष म्हणून  वंदना साळवे यांची निवड करणेत आली. खजिनदार पदी दिपक घोडके व  अविनाश गवळी काम पाहणार आहेत. मावळते अध्यक्ष प्रदीप महाडिक व जनरल सेक्रेटरी  आशिष चव्हाण यांनी तरुण तसेच कार्यकारीणीतील नवीन सहकाऱ्यांना मार्गदर्शन तसेच सल्लागाराची भूमिका बजावणार आहोत अशी भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली. (Pune Municipal Corporation Employees)
अध्यक्ष  पोखरकर व जनरल सेक्रेटरी पवार यांनी या पुढील काळात सेवकांचे असणारे प्रश्न मार्गी लावून सेवकांचा विश्वास संपादन करू. तसेच सेवकांनीही नवीन कार्यकारीणीला सेवकांचे प्रश्ना संदर्भात तसेच युनियनच्या प्रत्येक कार्यक्रमात पाठिंबा देऊन पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवावे असे सर्व सेवकांना आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील सेवक उपस्थित होते.  राजू ढाकणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.  तसेच सूत्रसंचालनाचे काम पाहिले.माजी कार्याध्यक्ष  भास्कर महाडिक यांनी समारोप करून सभेची सांगता झाली. (PMC Pune Employees)
——-
News Title | PMC Employees Union | Bajrang Pokharkar was elected as President of PMC Employees Union and Bapu Pawar as General Secretary.

PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ महापालिकेचाच कर्मचारी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ पुणे महापालिकेचाच कर्मचारी! 

 
 
PMC Fake Identity Card | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. अशा प्रकारचे बोगस ओळखपत्र तयार करून देणारा हा महापालिकेचाच कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. ‘आयडी चौधरी’ या नावाने त्याला ओळखले जाते. हा उद्योग करून त्याने लाखो रुपये देखील कमावले आहेत. यावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Fake Identity Card)
मागील आठवड्यपासून पुणे महापालिकेत (PMC Pune) ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. ओळखपत्र आणि लेस चा वापर करून महापालिकेत प्रवेश मिळवला जात आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान असे बोगस ओळखपत्र बनवणारी अशी कुठली कंपनी किंवा टोळी नसून एकच व्यक्ती असल्याचे समोर येत आहे. हा महापालिकेचाच कर्मचारी आहे. त्याला ‘आयडी चौधरी’ म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या ऑडिट विभागात हा कर्मचारी काम करतो. याची 2020 सालापासून म्हणजे कोरोना काळापासून सुरु आहे. कारण टाळेबंदीच्या काळात महापालिकेच्या कायम तसेच ठेका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर फिरण्यासाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले होते. काही कर्मचाऱ्यांकडे आयडी च्या लेस नव्हत्या तर काही लोकांकडे आयडी नव्हते. मग हा कर्मचारी लेस बनवून देत असे. त्याचा दर 70-100 रु असा होता. आता हा दर 150-200 रुपयांपर्यंत गेला आहे. कोरोना काळात जवळसपास सर्वच कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी पैसे देखील खर्च केले आहेत. त्याचप्रमाणे ओळखपत्र बनवण्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. ज्यावर विभागप्रमुख किंवा अधिकारीक व्यक्तीचा सही शिक्का आणण्यास सांगितला जातो. त्यानुसार ओळखपत्र बनवून दिले जाते. याचा लाभ सद्यस्थितीत ठेका तत्वावर, मानधनावर काम करणारे कर्मचारी, ठेकेदार, लायझनिंग करणारे लोक घेत आहेत. ही सगळी कामे हाच कर्मचारी करतो. 
सध्या तरी महापालिका प्रशासनाने असे ओळखपत्र जप्त केले  आहेत. मात्र हे बनवण्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune News) 
———
 News Title | PMC Fake Identity Card | ‘ID Chaudhary’ who made bogus identity card is an employee of the Pune Municipal Corporation!