Tag: Pune Municipal Corporation
PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ पुणे महापालिकेचाच कर्मचारी!
PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण
| केंद्र बंद करण्याची अथवा करार रद्द करण्याची आवश्यकता नाही :
MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा
| पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
MNS Pune | Pune Metro |महाराष्ट्र राज्यात पुणे शहराची ओळख शैक्षणीक,सांस्कृतीक अशी आहे. या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकच्या नावात आपला ऐतिहासीक वारसा जपण्याची परंपरा कायम रहावी. याकरिता या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक (Chhatrapati Shivaji Maharaj Metro Station) व मंडई भागातील स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक (Mahatma Jyotiba Phule Mandai Station) असेच ठेवण्यात यावे. ऐतिहासिक वारसा परंपरा जपणे हाच मुख्य उद्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (MNS Pune | Pune Metro)
मनसे च्या निवेदनानुसार पुण्यात गेल्या दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधींमुळे भारताच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहराचे संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योगांतील नोकरदार, विध्यार्थी घटकांना सुलभ वाहतुकीसाठी शासनाच्या पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्थेची काळाची गरज ओळखून पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-1 ,2,3 मध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा,दिवाणी न्यायालया जवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे प्रशासनाने या स्थानकांची नावे शिवाजी नगर व मंडई अश्या चुकीच्या ऐकेरी नावे केल्यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
News Title |MNS Pune | Pune Metro | Name the Pune Metro Station Chhatrapati Shivaji Maharaj and Mahatma Jotiba Phule Mandai Station | Demand of Pune City MNS to Municipal Commissioner
PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र
जे लोक महापालिकेत अशा पद्धतीने बोगस ओळखपत्र वापरतात त्यांनी आपल्या कंपनीचे किंवा ठेकेदाराच्या नावाचे ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. आम्ही हे जप्त केलेले ओळखपत्र सामान्य प्रशासन विभागाकडे देणार आहोत.
महापालिकेत जे लोक बोगस ID कार्ड धारण करतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच असे ओळखपत्र बनवून देणाऱ्या लोकांना देखील कारवाई केली जाईल. मनपा कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र घालणे आवश्यक आहे.
PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा
| भरतीबाबत महापालिका प्रशासनाकडून उमेदवारांना आवाहन
दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये
महापालिकेच्या आवाहनानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी (Pune Mahanagarpalika Bharti 2023) वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांत सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरीत्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. याद्वारे सर्व नागरिकांना/उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित व्यक्तींशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरूपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. (PMC Pune Recruitment 2023)
PMC Retired Employees | सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके आवश्यक कागदपत्रांसह पाठवण्याचे आदेश
| मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश
अंशराशीकरण करणेबाबतचे फॉर्म सेवकाने सादर केले नसल्यास अशा सेवकांकडून फॉर्म व भरून घेतलेला असावा अथवा त्यांस अंशराशीकरण करावयाचे नाही, अशा आशयाचे पत्र खात्याने सेवापुस्तकासोबत सादर करावे. तसेच अंशराशीकरण करणेबाबतचा फॉर्म अ नव्याने स्वीकारण्यात येऊ नये.
२) सुधारित दराने म्हणजेच सातव्या वेतन आयोगातील तरतूदीनुसार आकारणी केलेली असावी. सुधारित सरासरी वेतनाचा तपशिल इ. कागदपत्रे जोडावेत.
३) सुधारित वेतनानुसार ज्या सेवकांना शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनापोटी रक्कम देय असेल, त्यांस मूळ खात्यामार्फतफरकाची रक्कम अदा करणेत येईल. तथापि, याबाबत वसुली येत असल्यास सुधारित वेतनानुसार वसुली बील सोबत सादर करणे आवश्यक आहे.
४) उपरोक्तबाबत सर्व मा. खातेप्रमुख / महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी आपले अधिनिस्त वेतन बील लेखनिकांचाआढावा घेऊन उर्वरित प्रकरणे तात्काळ मुख्य लेखा व वित्त विभागास सादर करणेबाबत संबंधिताना आदेशित करावे. (PMC Pune News)
PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू
| शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा
PMC Hospitals | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन (Liftman) नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ लिफ्टमन नेमण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पृथ्वीराज सुतार (Shivsena Leader Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच नेमणूक नाही झाली तर आंदोलनाचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. (PMC Hospitals)
सुतार यांच्या निवेदनानुसार मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या ईमारती बहुमजली आहेत; म्हणून रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते. (PMC Pune News)
परंतु आता आपल्या विद्युत विभागाने (PMC Electrical Department) या लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही, असा फतवा काढला आहे. हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.
News Title | PMC Hospitals | Liftman in Pune Municipal Hospital or else we will protest | Shiv Sena leader Prithviraj Sutar’s warning to the Municipal Corporation
MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार | मंत्री उदय सामंत
| आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न
MLA Ravindra Dhangekar | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना (Merged villages) पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी उपस्थित केला होता. (MLA Ravindra Dhangekar)
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. (PMC Pune News)
या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
००००
News Title |MLA Ravindra Dhangekar | Funds will be given for water supply to newly included villages in Pune Municipal Corporation Minister Uday Samant | The question was raised by MLA Ravindra Dhangekar