PMC Pune Employees | मृत आणि सेवानिवृत्त सेवकांना देखील प्रशासनाकडून दिल्या जातात ऑर्डर  | सेवकांची यादी अद्ययावत केली जात नसल्याची माहिती 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | मृत आणि सेवानिवृत्त सेवकांना देखील प्रशासनाकडून दिल्या जातात ऑर्डर

| सेवकांची यादी अद्ययावत केली जात नसल्याची माहिती

PMC Pune Employees | पुणे | राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात मराठा समाज (Maratha Samaj) आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण (Open Category Survey) करण्यात येणार आहे. पुणे शहरात (Pune City) देखील हे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) 1 हजार 5 कर्मचाऱ्यांची (Pune Corporation Employees) या कामासाठी प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची यादी सरकारला पाठवण्यात आली आहे. मात्र या यादीतील काही सेवक असे आहेत जे मृत झालेले आहेत. तसेच सेवानिवृत्त देखील झाले आहेत. महापालिका प्रशासनाच्या या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.  (PMC Pune News)
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम दिले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात देखील हे काम असणार आहे. आगामी काळात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेकडून माहिती मागवण्यात येत आहे. कमी कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यकता आहे. प्रशासनाकडून विविध खात्यातील 1 हजार 5 कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त केले आहेत. दरम्यान हे काम कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असेल. या कर्मचाऱ्यांची माहिती सरकारला पाठवण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
दरम्यान या यादीतील काही सेवक हे मृत झालेले आहेत तर काही सेवक हे सेवानिवृत्त झालेले आहेत. असे असतानाही या सेवकांना ऑर्डर कशी दिली गेली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खरे पाहता ही यादी अद्ययावत करून पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रशासनाची उदासीनता येथे दिसून आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारले असता सांगण्यात आले कि माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून आम्ही यादी घेतो. त्यानुसार ऑर्डर काढल्या जातात. तसेच नावे भरपूर असल्याने आम्ही प्रत्येक नाव तपासू शकत नाही. तसेच अशा यादीत 1% चूक गृहीत धरलेली असते. तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला माहिती विचारली असता सांगण्यात आले कि सामान्य प्रशासन विभागाकडून सेवकांची माहिती अपडेट करण्यासाठी आली तर आम्ही तात्काळ बदल करून घेतो. आम्ही शेवटची यादी 6 डिसेंबर ला दिली होती. त्या यादीत  ऑक्टोबर अखेर पर्यंतच्या सेवकांची माहिती होती.
याचाच अर्थ असा होतो कि दोन महिने जुनी यादी सरकारला पाठवण्यात आली. प्रशासनाने मनावर घेतले असते तर डिसेंबर अखेर किंवा जानेवारी 10 पर्यंतच्या सेवकांची अपडेट माहिती देता आली असती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच मृत सेवकांना देखील ऑर्डर गेली आहे. यासाठी आता कुणाला जबाबदार धरले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
—-

PMC pune Vs Irrigation Pune | पुणे महापालिका आणि पाटबंधारे यांच्या वादात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे | आप च्या विजय कुंभार यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC pune Vs Irrigation Pune | पुणे महापालिका आणि पाटबंधारे यांच्या वादात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे | आप च्या विजय कुंभार यांची मागणी 

 
 
PMC Pune Vs Irrigation Pune | पुणे | पुणे शहराच्या पाणी कोट्यावरून (Pune Water Quota) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि पाटबंधारे विभाग (Pune Irrigation Department) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. पुणे महापालिकेने सादर केलेल्या वॉटर बजेट (PMC Pune Water Budget) मध्ये जेवढा पाणी कोटा मागितला त्यापेक्षा खूप पाणी कोटा पाटबंधारेने मंजूर केला आहे. शिवाय समाविष्ट गावांना देखील आम्हीच पाणी देतो, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला चांगलेच सुनावले आहे. मात्र या दोन संस्थांच्या वादात पुणेकर हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केली आहे. (PMC Pune Vs Irrigation Pune) 
 
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 34 गावांचा (34 included Villages) झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता अर्थात 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी (20.90 TMC) पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट (PMC Pune Water Budget 2013-24) जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) सादर करत ही मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला फक्त 12.82 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. समाविष्ट 34 गावांना आम्हीच पाणी देतो असे म्हणत पाटबंधारे विभागाने 2.34 टीएमसी पाणी कमी केले आहे.  यामुळे महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. समाविष्ट गावांना पुणे महापालिकेने पाणी देणे बंद केले तर याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारेची राहील, असा इशारा पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation) 

पुणे महापालिकेकडून दरवर्षी जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर करत पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी केली जाते. यावर्षी 20.34 टीएमसी पाणी मागण्यात आले होते. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने फक्त 12.82 TMC पाणी कोटा मंजूर केला आहे. पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा मनमानी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच महापालिकेने काही मागण्या देखील केल्या आहेत. (PMC Water Budget)  या वादावरून विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे आणि या वादात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 
—-

पुणे महापालिकेने ज्या मागण्या केल्या आहेत आणि त्या रास्त आहेत. त्यामुळे आपण पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका याच्यातील वाद मिटवावा. दोन आस्थापनांचा वादात पुणेकर हक्काचे पाण्यापासून वंचित राहू नयेत याची काळजी घ्यावी.

विजय कुंभार, उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र 

PMC Property Tax | थकबाकी असणाऱ्या 787 व्यायसायिक प्रॉपर्टी सील | 55 कोटी होती थकबाकी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax | थकबाकी असणाऱ्या 787 व्यायसायिक प्रॉपर्टी सील | 55 कोटी होती थकबाकी

PMC Property Tax | कर आकारणी व करसंकलन विभागाकडून (PMC Property Tax Department) मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतीवर (Commercial Properties) सिलिंग कारवाई (Sealing Action) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून 787 बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यांच्यावर 55 कोटींची थकबाकी आहे. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रॉपर्टी टॅक्स  (PMC property tax) विभागाकडून देण्यात आली. (PMC Property Tax)

दररोज 50 प्रॉपर्टी सील करण्याचे टार्गेट

दरवर्षी थकबाकी ठेवण्याचे प्रमाण व्यावसायिक मिळकती कडून वाढत आहे. यावर आला घालण्यासाठी महापालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी खात्याला दररोज थकबाकी असणाऱ्या 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

31 जुलै पर्यंत सवलत मिळवा

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना (Pune Property Holder) आवाहन महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सन २०२३-२४ ची देयके (PMC Property Tax bill) वितरीत करण्यात आली असून ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. (PMC Pune News)

महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घ्या

१५ मे २०२३ ते दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर भरल्यास पुणे महानगरपालिकेकडून र. रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही केवळ आपला संपूर्ण मिळकतकर ३१ जुलै २०२३ ह्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Property Tax Lottery) 

: 731 कोटी महसूल जमा

दरम्यान महापालिकेला आतापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स मधून 731 कोटींचा महसूल मिळाला आहे. टॅक्स विभागाला अपेक्षित आहे कि हे उत्पन्न जुलै अखेर पर्यंत 1000 कोटी होईल. त्यानुसार वसुली मोहीमेवर जोर देण्यात आला आहे. मात्र विभागाला हे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची वानवा भासत आहे. (Pune Property Tax)
—-
News Title | PMC Property Tax | 787 outstanding commercial property seals 55 crore was outstanding

PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता  187 नवीन पदे |  पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी | 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता  187 नवीन पदे |  पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी

| 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार

PMC Pune Social Devlopment Department | (Author – Ganes Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागाच्या (Social Devlopment Department) वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेकडे पर्याप्त कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून मानधन तत्वावर काही कर्मचारी घेतले होते. मात्र या कर्मचाऱ्यांची निकड महापालिकेला सातत्याने भासू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) वतीने ही कामे करण्यासाठी 187 नवीन पदे (New Post) निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे (State Government) प्रस्ताव पाठवला होता. तसेच या पदांवर मानधन तत्वांवर काम करणाऱ्या 160 कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी या प्रस्तावात केली होती. या दोन्ही गोष्टीना राज्य सरकारच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश (GR) देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे. (PMC Pune Social Devlopment Department)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) क्षेत्रात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना (Social Welfare Schemes) तसेच, महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी या योजनेअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे महत्वाचे कामकाज समाज. विकास विभागामार्फत केले जाते. यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागात व्यवसाय गट ” मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समुपदेशक, समूहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्वावर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र या  पदांची पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागास (PMC Social Devlopment Department) आवश्यकता असल्याने, पुणे महानगरपालिका च्या वतीने  या पदांची पदनिर्मिती करणे व त्या पदांवर या सेवकांना सामावून घेण्याबाबत मुख्य सभेने (PMC Général Body) मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी समाज विकास विभागात  १८७ पदांची पदनिर्मितीस मंजूरी मिळणे व त्या पदांवर १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला होता. कारण   पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या आकृतीबंध मध्ये या पदांचा समावेश नव्हता. त्यामुळे सदर पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)

160  कर्मचाऱ्यांचे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नियमित समायोजन करण्याबाबत खालील अटी असतील 
१) सदर कर्मचाऱ्यांची सेवा शासन निर्णयाच्या दिनांकापासून महानगरपालिकेच्या सेवेत कायम समजण्यात यावी.
२) या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याच्या दिनांकापासून पुढे सेवेचे तद्नुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन इ.) अनुज्ञेय राहतील.
३) सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी केलेल्या सेवेचे कोणतेही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नाही.
४) सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता कोणताही निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार नाही.
५) सेवेत कायम करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र घेऊन मागील कोणताही लाभ मिळणार नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
६) उपरोक्त समायोजन करण्यात येणारे समाज विकास विभागातील सेवक यांना स्थायी नेमणूक देतांना हजेरी
डिफॉल्ट रेकॉर्ड, चौकशी, सेवाजेष्ठता, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी निकष तपासून नियमानुसार स्थायी नेमणूक देण्यात येईल. संबंधित कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या आदेशाच्या दिनांकापासून ०६ महिन्याच्या कालावधीत चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
७) प्रस्तावित मानधन तत्वावरील कर्मचारी यांचे वय सेवा भरती नियमांमध्ये नमूद केलेल्या वयोमर्यादे पेक्षा जास्त असल्यास वयाची व शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.
८) पुणे महानगरपालिकेने प्रस्तावासोबत पाठविलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणाचेही समायोजन या मंजूर पदांवर करता येणार नाही.
९) आस्थापना खर्च ३५ टक्के मर्यादीत राहील याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी.
१०) सदर समायोजन पूर्वउदाहरण म्हणून इतर समायोजनाच्या प्रस्तावाबाबत वापरता येणार नाही.
——
News Title-: PMC Pune Social Development Department | Now 187 new posts in Social Development Department of Pune Municipal Corporation Approval of the State Government for the creation of posts

PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाकडील (PMC health department) उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpana Baliwant) यांचेकडील कार्यभार व कामकाज व्यवस्थेबाबत बदल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आरोग्य प्रमुखांच्या दैनंदिन कामात तसेच त्यांच्या  रजा कालावधीत त्यांचे सर्व काम हे डॉ बळिवंत यांनी पाहायचे आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune Civic Body) नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (PMC Health Department)

पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य विभागाकडे (Pune Municipal Corporation Health Department) पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत विविध कामे चालतात. त्यामध्ये पुणे मनपाचे दवाखाने, प्रसूतिगृह, ई. हॅल्थ सेंटर, वस्ती क्लिनिक, परवाने, राष्ट्रीय वैद्यकीय योजना, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना इ. कामांचा समावेश होतो.  संबंधित कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने होणे आवश्यक आहे. त्यामुळे उप आरोग्य अधिकारी यांची जबादारी वाढवली आहे. (PMC Pune Marathi News)

 डॉ. कल्पना बळीवंत सहा. आरोग्य अधिकारी वर्ग १ या पदावरून उप आरोग्य अधिकारी वर्ग-१ या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे PCPNDT विभागाची जबाबदारी होती. ती काढून घेत नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation News)

डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग

१. आरोग्य अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात मदत करणे.
२. आरोग्य अधिकारी यांचे रजा कालावधीत त्यांचे कामकाज करणे.
३. परिमंडळ क्र. १ ते ५ करिता सनियंत्रक म्हणून कामकाज करणे.
४. जन्म मृत्यू विभाग, स्मशान भूमी व दफनभूमी अद्यावतीकरण करणे.
—-
News Title | PMC Health Department | Deputy Health Officer Dr. Kalpana Baliwant’s duties increased

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक

| अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Pune Officers and Employees) कामावर असताना ओळखपत्र (Identity) तसेच गणवेश (Uniform) परिधान करणे, बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी काही कर्मचारी मात्र हा नियम पाळताना दिसत नाही. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC additional commissioner Ravindra Binwade) यांनी कडक पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी  ओळखपत्र आणि गणवेश परिधान करण्याची जबाबदारी खाते प्रमुखांवर देण्यात आली आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई देखील खाते प्रमुख यांची करायची आहे. अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) आस्थापनेवरील विविध हुद्यांवरील सेवकांचे गणवेश हे  सुधारित गणवेश नियमावलीनुसार (Uniform Policy) निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने संबंधित सेवकांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. सुधारित गणवेश नियमावलीनुसार अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग इ. कार्यालयात काम करणारे सेवक व शिपाई संवर्गातील सेवक इ. सेवकांना गणवेश अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.  तसेच संबंधित सेवकांनी गणवेश परिधान करणेबाबत  प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश प्रसृत करण्यात आलेले आहेत. तसेच याबाबत  संबंधित खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी / अधिक्षक यांनी त्यांचे नियंत्रणाखालील विभागामध्ये तपासणी करण्याबाबत देखील सूचना निर्गमित केलेल्या आहेत. (PMC Pune Marathi News)

तथापि, त्याप्रमाणे संबंधित कर्मचारीवर्ग गणवेश परिधान करीत नसल्याच्या तसेच अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत पुणे महानगरपालिकेचे ओळखपत्र परिधान करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब कार्यालयीन शिस्तीस सोडून आहे . त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी  सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार सूचित करण्यात आले आहे कि खातेप्रमुखानी त्यांच्या  अखत्यारितील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यावर कार्यरत असताना मान्य गणवेश आणि ओळखपत्र परिधान करण्याबाबतचे आदेश निदर्शनास आणून द्यावेत. तसेच जे अधिकारी / कर्मचारी मान्य गणवेश
आणि ओळखपत्र परिधान करणार नाहीत, त्यांचेवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांची राहील. (PMC Pune Employees)
News title | Pune Municipal Corporation News |  Officials and employees of Pune Municipal Corporation are required to wear identity card and uniform

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा | दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा

| दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Pune Municipal corporation पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी (PMC Pune employees) विविध योजना राबवल्या जातात. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) माध्यमातून या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी नुकतेच सेवानिवृत्त झालेले महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) यांचा मोलाचा हातभार आहे. दौंडकर यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने या योजना कामगारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. याचा कर्मचाऱ्यांच्या कित्येक कुटुंबाना देखील फायदा झाला. महापालिकेत स्टेनो (Steno) म्हणून रुजू होऊन आणि सह महापालिका आयुक्त तथा मुख्य कामगार अधिकारी (Chief labour officer) पदा पर्यंतचा शिवाजी दौंडकर यांचा प्रवास खूपच रंजक आहे. (Pune municipal corporation)
शिवाजी दौंडकर हे नुकतेच महापालिकेच्या सेवेतून म्हणजे 31 मे ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी महापालिकेच्या विविध पदांवर काम केले. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, सह महापालिका आयुक्त, शिक्षण विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, अशा विविध कामाचा समावेश आहे. मात्र मुख्य कामगार अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द कायम लक्षात राहील. कारण त्यांच्या कारकिर्दीत कामगारांच्या लाभाच्या खूप योजना राबवल्या आणि त्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना फायदा करून दिला. (PMC Pune Marathi news)

 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका

 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली होती. महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाते. महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले होते. कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले होते.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाची आर्थिक मदतदिली जाते. तसेच वारसाला नोकरी दिली जाते     या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारी तर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 60 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे.  महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे. तसेच 40 कोटींची मदत देण्यात आली आहे. हे सर्व करण्यात मुख्य कामगार अधिकारी म्हणून शिवाजी दौंडकर यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना अर्थसहाय्य आणि वारसांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

182 कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याची सुरुवात 2007-08 साली झाली. शिवाजी दौंडकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अवगत करून प्रोत्साहन दिले. आतापर्यंत 182 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर जवळपास 41 लाखांची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

समूह अपघात विमा योजनेचा देखील चांगला फायदा

शिवाजी दौंडकर यांच्या कार्यकाळात सुरु झालेली अशीच एक योजना म्हणजे समूह अपघात विमा योजना. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात.  हे लोक आयुष्यात काम करू शकत नाहीत.  तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो.  त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो.  त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा पालिका कर्मचाऱ्यांना महापालिका विमा संरक्षण देत आहे.  पालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे 10 लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे.  त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 136 रुपये दरमहा द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 18 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. दौंडकर यांच्या पुढाकाराने ही योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे.
याच पद्धतीने अजूनही बऱ्याच योजना कामगार कल्याण विभागात सुरु आहेत. ज्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी शिवाजी दौंडकर यांनी प्रयत्न केले. यामध्ये कामगार कल्याण निधी आणि मनपा निधी मधून वारस अनुदान दिले जाते. आतापर्यंत 1536 लोकांना या योजनेचा फायदा झाला. जवळपास 10 कोटीची रक्कम यासाठी देण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. आतापर्यंत 24 कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. यासाठी 85 लाखाची रक्कम देण्यात आली आहे. तसेच दौंडकर यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा, कामगार दिंडी, शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती आणि गुणगौरव समारंभ अशा योजना देखील चांगल्या पद्धतीने राबवल्या.

शिवाजी दौंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात 8578 पेन्शन प्रकरणे निकाली काढली. तसेच इंडेम्निटी बॉण्ड चा 1862 लाभार्थ्यांना लाभ दिला. ध्वजदिन निधी संकलनाचे काम देखील चांगल्या पद्धतीने पार पाडले. या माध्यमातून 2 कोटीहून अधिक निधी संकलित केला गेला. जवळपास 731 कर्मचाऱ्यांना कामगार प्रशिक्षण दिले. खातेनिहाय चौकशीची 155 प्रकरणे निकाली काढली. कामगार न्यायालयातील विविध दाव्यांपैकी 356 दावे निकाली काढण्यात आले. त्याचप्रमाणे घाणभत्ता आणि अनुकंपा योजनाचाही फायदा देण्यात आला. यामध्ये घाणभत्ता ची 3729 तर अनुकंपा ची 351 प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व गोष्टीसाठी दौंडकर यांना कामगार कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगली मदत झाली, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
—-
पुणे महापालिकेत मी 1988 साली रुजू झालो. सर्वात प्रथम मी गवनि विभागात स्टेनो म्हणून काम केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयात स्वीय सहायक म्हणून 11 वर्ष काम केले. त्यानंतर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक म्हणून 2 वर्ष काम केले. 2003 साली कामगार कल्याण अधिकारी झालो. 2010 साली मुख्य कामगार अधिकारी झालो. याशिवाय महापालिकेत बऱ्याच ठिकाणी आणि खात्यात काम केले. यामध्ये सेवक वर्ग, प्राथमिक माध्यमिक, नगरसचिव विभाग अशा खात्यांचा समावेश आहे. माझ्या कार्यकाळात मी खूप कल्याणकारी योजना राबवल्या. कोरोना काळात चांगले काम केले. कर्मचाऱ्यांच्या वारसांना घरी जाऊन चेक दिले. तसेच कोरोना काळात Online आणि offline सर्वसाधारण सभा घेताना तारेवरची कसरत होती. असे असताना चांगले काम केले. नगरसेवक किंवा प्रशासनाची तक्रार येऊ दिली नाही. तसेच निवडणूक विभागात देखील काम केले.  महापालिकेच्या कामात चांगले योगदान देता आले म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्वसाधारण कामगारांचे प्रश्न सोडवता आले, ही भावना सुखद आहे.  भविष्यकाळात मला माझ्या कामाचा आणि ज्ञानाचा महापालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात मला आनंद वाटेल.
शिवाजी दौंडकर, सेवानिवृत्त महापालिका अधिकारी. 
—-
News Title | Pune Municipal Corporation | Many employees benefited from the efforts of Shivaji Daundkar in the welfare schemes of Pune Municipal Corporation

PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड

PMC Pune RFD project | जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) वृक्ष रोपणाच्या (Tree plantation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान रे १० ते १५ फुट उंचीची रोपे लावण्यात आली आहेत. यापूर्वी देखील पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) स्वदेशी ५० रोपांची लागवड जानेवारी २०२३ दरम्यानच्या काळात करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) देण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त   विकास ढाकणे व अधिक्षक अभियंता युवराज देशमुख व वृक्ष प्राधिकरण अधिक्षक  अशोक घोरपडे व इतर अधिकारी कर्मचारी इ.उपस्थित होते.

नदी सुधारणा प्रकल्प (River front Devlopment project) अंतर्गत शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान ३०० मी. नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या नदीकाठ सुधारणेमध्ये वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत सुमारे ६९,००० रोपांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. स्ट्रेच ९ मध्ये १५३४ झाडे सुभाबूळ, कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. स्ट्रेच १० व ११ मध्ये सुमारे १२५३ झाडे सुभाबूळ,कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. ही झाडे काढून सदर ठिकाणी विदेशी प्रजाती ऐवजी स्वदेशी रोपे लावण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation RFD project)

नवीन लागवड करण्यात येणाऱ्या झाडांची नावे पुढील प्रमाणे :-

* करंज, मेढसिंगी, कांचन, कदंम्ब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, बकुळ, काळाकुडा, पानजांभूळ इ. फुले येणारी झाडे.
* आंबा, जांभूळ, गुलार, पुत्रवंति, भोकर, खिरणी, अर्जुन, आसन, चिरंजी इ. फळझाडे जी पक्षांसाठी उपयोगी आहेत.
* घोळ, अर्जुन, आंबा, खिरणी इ. पक्षांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडे.
* लिंब, कदम्ब, जांभूळ, आंबा, वड इ. मोठी झाडे सावलीसाठी.
—-
News Title | PMC Pune RFD project | Plantation of saplings by Pune Municipal Corporation under River Improvement Project

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सायकल वारी

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सायकल वारी

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका सेवकांच्या (PMC Pune Employees) वतीने दरवर्षी प्रमाणे सायकलच्या वापराला चालना देण्यासाठी पुणे महानगरपालिका सायकल क्लबतर्फे (PMC Cycle  luv) सायकल वारी (Cycle wari) काढली जाते. यंदा देखील सायकल वारी काढण्यात आली. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) दिलेल्या माहितीनुसार उप आयुक्त श्री. माधव जगताप, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, श्री. उमाकांत डिग्गीकर, श्री. विशाल पाटील, अभिमन्यू गाडे, श्री. महेश कारंडे, श्री. प्रशांत गवळी, श्री. रणजित गवळी, श्री. जयसिंग गायकवाड, श्रीमती संगीता कोकाटे, श्रीमती मेघा राऊत, श्रीमती पूजा ढोले, श्री. मारटकर, श्री. सचिन शिंदे, श्री. आकाश निकम, श्री. मयूर शिंदे व इतर असे सुमारे २० सदस्यांची पुणे ते पंढरपूर अशी ‘सायकलवारी’ काढण्यात आली. (PMC Pune News)
 सायकल रॅलीच्या प्रवासामध्ये जी २० परिषदेच्या (G 20 summit in Pune) निमित्त शहराच्या सुशोभीकरणाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या सायकल रॅलीला पुणे महानगरपालिकेचे  महापालिका आयुक्त श्री विक्रमकुमार (pmc commissioner Vikram Kumar? तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त,  रविंद्र बिनवडे (Additional commissioner Ravindra Binwade) यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. पुणे महापालिका भवन ते विठ्ठल- रुक्मिणी मंदिर पंढरपूर असा सायकल रॅलीचा प्रवास करण्यात आला. या प्रवासा दरम्यान पुणे महानगरपालिका सेवकांच्या वतीने पालखी मार्गावर जागोजागी नागरिकांना भेटून सायकल चालविणेबाबतचे महत्व सांगून पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. तसेच पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील पोंदवडी या गावातील ग्रामस्थांच्या मदतीने पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोंदवडी गावचे सरपंच श्री. नाना बंडगर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
——
News Title | Pune Municipal Corporation |  Bicycle procession of Pune Municipal Corporation employees

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले

| आगामी 30 दिवसांत योग्य निर्णय घेण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश

PMC Pune Employees Promotion | (Author : Ganesh Mule) |पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि तसेच इतर संवर्गातील १० ते १२ पदांच्या पदोन्नती (Promotion) रखडली आहे. तर दुसरीकडे अभियंता संवर्गातील पदोन्नती (Engineering cadre promotion) तात्काळ केली जाते. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. महापालिका प्रशासनाच्या या कामकाजाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेची तक्रार भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे (National Commission for scheduled castes) केली होती. याबाबत आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना (PMC commissioner) चांगलेच सुनावले आहे. आगामी 30 दिवसांत यावर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसे नाही झाले तर आम्हांला याचा तपास करावा लागेल, असा इशारा देखील आयोगाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. (PMC Pune Employees promotion)
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा नियमावलीत (service rules) बदल  केले जात आहेत. यामुळे या संवर्गातील कर्मचारी हवालदिल झाले असून आमच्यावर अन्याय होत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. (PMC Pune Employees)
महानगरपालिकेतील प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक”, उपअधीक्षक, (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (वर्ग-२) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. याबाबत महापालिकेने सरकारकडून मार्गदर्शन देखील मागवले होते. सरकारने यात दुरुस्ती सुचवली आहे. हा सगळा गोंधळ अनुभव आणि सेवा या शब्दांमुळे झाला आहे. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने सरकारकडे दुरुस्ती प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. मात्र तेच होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित राहावे लागत आहे. लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यावर अशा पद्धतीने अन्याय होत असताना दुसरीकडे अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या मात्र तात्काळ केल्या जातात. प्रशासनाच्या या भेदभाव करण्याच्या कामकाजाला महापालिका कर्मचारी कंटाळले आहेत. यामुळेच काही कर्मचाऱ्यांनी याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने याची खूप गंभीरपणे दखल घेतली आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)

| राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नेमके काय म्हटले आहे?

महापालिका कर्मचाऱ्याकडून 25 मे ला याबाबत तक्रार करण्यात आली होती. भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (National Commission for scheduled castes) याची तात्काळ दखल घेत 1 जून ला महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. आयोगाने म्हटले आहे कि, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे भारतीय आयोग घटनेच्या कलम ३३८ अन्वये आयोगाला बहाल केलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने, आम्ही तपास करण्याचे ठरवले आहे. यात सुधारणा होईल, अशी आशा आहे.  आणि आयोगाला याबाबत केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली जाईल. अशी आशा आहे, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने आयुक्तांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे कि तुम्हाला हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आयोगाकडे याबाबत योग्य कार्यवाही करून निवेदन सादर करावे.    यामध्ये कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पॅरानिहाय टिप्पण्यांसह पुढील तपासासाठी प्रकरणातील संपूर्ण तथ्ये मांडण्याची व्यवस्था करा. जेणेकरून या प्रकरणात योग्य तो निर्णय घेता येईल. लक्षात ठेवा की जर आयोगाला निर्धारित कालावधीत तुमचे उत्तर प्राप्त झाले नाही तर भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये आयोगाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाईल. असा इशारा देखील दिला आहे. (PMC Pune Marathi News)
यावरून तरी महापालिका प्रशासन काही धडा घेऊन पदोन्नतीच्या विषय मार्गी लावेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणार नाही, अशी अपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News title | PMC Pune Employees Promotion | The National Commission for Scheduled Castes reprimanded the Commissioner over the stalled promotions in the Pune Municipal Corporation