Tag: पुणे महानगरपालिका
Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | माजी नगरसेवक दत्ता बहिरट
| श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – बहिरट
Datta Bahirat Patil | पुणे | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11) येथील आशा नगर पाण्याच्या टाकीची (PMC Aasha Nagar Water Tank) उभारणी काँग्रेसच्या आणि माझ्या प्रयत्नातून झाली असून प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) उदघाटन कॉंग्रेस कार्यकर्ते करतील, असे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat Ex Corporator) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (Datta Bahirat Patil Pune Shivajinagar)
या पत्रकार परिषदेला माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) उपस्थित होते.
नगरसेवक या नात्याने २० एप्रिल २०१२ रोजी आशानगर टाकीचे काम सुचविले. टाकीसाठी आशा नगर हौसिंग सोसायटी यांच्याशी संवाद साधून विनामोबदला जागा मिळवून दिली. नंतर सातत्याने पाठपुरावा केला, सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नाव निश्चित केले,अशी माहिती बहिरट यांनी दिली. भाजपचे स्थानिक आमदार केवळ श्रेय उपटू पहात आहेत, असा आरोप बहिरट यांनी केला.
आशानगर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता दत्ता बहिरट यांनी सन २०१रपासून अथक प्रयत्न केले. वीस लाख लिटर्स क्षमतेची टाकी झाली आणि आता भाजपचे स्थानिक आमदार आयत्या बिळावर रेघोट्या मारत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ तारखेला उदघाटन करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टाकी उभारणी कामाचे श्रेय बहिरट यांचे मान्य करावे, त्यांना डावलू नये अशी विनंती पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. या उपरही टाकी उदघाटन कार्यक्रम होणार असेल तर कॉंग्रेस कार्यकर्ते दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता करतील, असे आमदार रवि धंगेकर यांनी सांगितले.
PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेच्या भरती परीक्षेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 22 जून आणि 7 जुलै ला होणार आहे. त्यासाठीचे परीक्षा केंद्राची तयारी iBPS संस्थेकडून पूर्ण झाली आहे. या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 44 कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केल्या आहेत. (PMC Pune Bharti Exam)
पुणे महानगरपालिका (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग – ३ संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया IBPS या संस्थेकडून पार पाडली जात आहे. यापूर्वी इच्छुक उमेदवारांचे आवेदन अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने
मागविणेत आले आहेत. प्राप्त आवेदन अर्जानुसार संबंधित उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही IBPS या संस्थेने प्राधिकृत केलेल्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर २२/०६/२०२३ व ०२/०७/२०२३ रोजी तीन सत्रात संपन्न होणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) उक्त प्रमाणे आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेल्या मान्यतेनुसार 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधिक्षक, उपाधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. याबाबत उद्या या लोकांचे प्रशिक्षण देखील ठेवण्यात आले आहे.
किती आणि कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे?
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023)
हे आहेत सेवक
—
News Title |PMC Pune Bharti Exam | Appointment of 44 employees for Pune Municipal Corporation recruitment exam | Including Superintendent, Superintendent and Senior Clerk
६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत
| महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई
काय आहेत आदेश ?
मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार
पुणे :- महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघाने अनेक तक्रारी केल्या होत्या व आंदोलने केली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक घेतली. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असा विश्वास यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिला.
या बैठकीला सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख व मनपा उपायुक्त माधव जगताप, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, उज्वल साने, अरविंद आगम स्वप्नील कामठे, उमेश कोडीतकर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक काळे हे उपस्थित होते.
यावेळी सुरक्षारक्षकांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही, कामगार कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोयी सवलती मिळत नाहीत, ड्रेस, बूट, स्वेटर, काठी, सिटी इत्यादी साहित्य मिळत नाही. किमान वेतन कायद्यामध्ये झालेल्या वाढीच्या दराचा फरक मिळत नाही. कोणतेही कारण न सांगता पगारातून कपात केली जाते, कामावरून काढून टाकण्यात येते, अशा सर्व तक्रारींचा पाढा यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या समोर वाचला. या सर्व बाबींकडे महापालिकेकडून हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.
या सर्व प्रश्नांची गंभीर दखल कुणाल खेमनार यांनी घेतली. वेळेवर पगार करण्यास संदर्भातली व इतर सोयी सवलती व सुरक्षेची साधने देण्यासंबंधी चे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. जर कंत्राटदाराने दिलेले आदेश पाळले नाहीत तर संबंधित कंत्राटदारा वर कडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले व कामगार कायद्यामध्ये असणाऱ्या विविध सवलती बाबत कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांचे कडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही खेमनार यांनी या बैठकीत सांगितले.
इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार
| पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
| प्रशासन काय म्हणते?
| कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम
संघटनांना मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. सदर योजना खाजगी विमा कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी
कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तरी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कायमस्वरूपी बंद होऊन विमा कंपनीमार्फत नवीन वैद्यकीय योजना राबविल्यास सर्वच कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सन १९६७ पासून सुरू असलेली कामगारांचे आरोग्याशी निगडीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अशीच यापुढे देखील चालू राहावी, असे ही पदाधिकारी म्हणाले.
कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप
: राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका
पुणे : २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. अशी टीका राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
जगताप म्हणाले, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो, ते आरक्षण मंगळवार, दि. ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक शाखेने पुणे महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या सोडतीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य महापौरपदी विराजमान व्हावा, यासाठी मागील काही महिन्यांपासून आम्ही सर्व सहकारी व पदाधिकारी जिद्दीने कार्यरत आहोत. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. त्यामुळे, या पाच वर्षांत काहीही ठोस कामगिरी करता न आलेला आणि आत्मविश्वास गमावलेला भाजप आमच्याविरोधात निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकू, असा विश्वास आहे.
प्रभागनिहाय जे आरक्षण जाहीर झाले आहेत, त्यानुसार सक्षम व ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे निश्चितच जड आहे. पक्षाचे उत्तम संघटन व आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यांमुळे या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर विराजमान होईल, अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देतो. असे ही जगताप म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या
: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी
पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.
: असे असेल नियोजन
उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.
दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.
गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद
गुरूवार 2 जून रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार ३ जून रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत
| महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक
पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. सहा महिन्यांकरिता मानधनावर या नियुक्त्या होणार आहेत. यासाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
सन 2022-23 हे शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक भरती करण्याची गरज भासू लागली आहे. दरमहा 15 हजार रुपये मानधनावर हंगामी स्वरूपात या शिक्षकांच्या नेमणुका होणार आहेत. प्राथमिक शिक्षक या पदांसाठी निवड, प्रतीक्षा यादी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे यांना प्राधान्य देऊन नेमणुका होणार आहेत.
शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या वैयक्तिक माहितीसहचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसाक्षांकित, छायांकित प्रतीसह महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत समक्ष अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. पोस्टाने किंवा टपालाने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज सादर करताना उमेदवारांनाच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे.
—